Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा... गोलंदाजानं केली LBW अपील अन् पंचांनी दिला धक्कादायक निर्णय, Video

आगामी स्पर्धांमध्ये नो बॉल पाहण्याची जबाबदारी ही तिसऱ्या पंचाकडे सोपवण्याचा विचार सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:37 IST

Open in App

पंचांकडून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) त्यांच्या मदतीला अनेक तंत्रज्ञान आणले. पण, त्यातूनही अनेक त्रुटी असल्याचे अनेकदा जाणवले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 21 नो बॉल टाकले. पण, मैदानावरील पंचाला त्यापैकी एकही नो बॉल दिसला नाही. त्यामुळे आता आगामी स्पर्धांमध्ये नो बॉल पाहण्याची जबाबदारी ही तिसऱ्या पंचाकडे सोपवण्याचा विचार सुरू आहे.

6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत तिसऱ्या पंचाकडे नो बॉल पाहण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शिवाय इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) पुढील मोसमात नो बॉल पाहण्यासाठी एक अतिरिक्त पंच असणार आहे. त्यामुळे योग्य निर्णयांची अपेक्षा आहे. पण, आज आपण असा एक व्हिडीओ पाहणार आहोत. ज्यात पंचांकडून झालेल्या चुकीबद्दल काय बोलावं हेच समजणार नाही. इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात घडलेली ही घटना आहे. त्यात फलंदाजाचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला आणि गोलंदाजासह अन्य फलंदाजांनी LBW ची अपील केलं. त्यानंतर पंचांनी जो निर्णय दिला, तो पाहून तुम्हालाच धक्का बसेल..

पाहा व्हिडीओ..  

बाबो; हॅल्मेट घालून न्यूझीलंडच्या खेळाडूची गोलंदाजी, पण का?एका सामन्यात उपाययोजना असूनही गोलंदाज चक्क हॅल्मेट घालून गोलंदाजीला आला तर... होय हे खरं आहे. न्यूझीलंडचा खेळाडू चक्क बेसबॉल खेळातील हॅल्मेट घालून मैदानावर उतरलेला पाहायला मिळाला. न्यूझीलंड संघाचा माजी अष्टपैलू अँण्ड्य्रू एलिस असे या गोलंदाजाचं नाव आहे. येथील स्थानिक क्रिकेट सामन्यांत तो गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी त्याच्याकडे सर्व पाहातच राहिले. त्यानं चक्क हॅल्मेट घातलं होतं आणि तो तसाच गोलंदाजी करत होता. यामागे कारणही तसंच आहे. स्थानिक स्पर्धेतील मागील मोसमात गोलंदाजी करत असताना एलिसच्या डोक्यावर जोरात चेंडू आदळला होता आणि तसा धोका त्याला आता अजिबात पत्करायचा नव्हता. म्हणून तो हॅल्मेट घालून गोलंदाजीला आला.

टॅग्स :आयसीसीइंग्लंडसोशल व्हायरल