NZ vs SL : न्यूझीलंड-श्रीलंका खेळणार पाकिस्तानला बाहेर काढण्याचा डाव! कोण मारणार बाजी?

इथं जाणून घेऊयात कधी,  कुठं आणि कसा शिजणार पाकिस्तानला बाहेर काढण्याचा डाव?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:01 IST2026-02-25T12:40:31+5:302026-02-25T13:01:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
NZ vs SL T20 World Cup 2026 LIVE streaming Info When Where To Watch Super 8s Match Between New Zealand And Sri Lanka How Result Affected Pakistan | NZ vs SL : न्यूझीलंड-श्रीलंका खेळणार पाकिस्तानला बाहेर काढण्याचा डाव! कोण मारणार बाजी?

NZ vs SL : न्यूझीलंड-श्रीलंका खेळणार पाकिस्तानला बाहेर काढण्याचा डाव! कोण मारणार बाजी?

NZ vs SL T20 World Cup 2026 LIVE streaming Info  : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीत बुधवारी संयुक्त यजमानपद भुषवणारा श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. कोलंबो येथील आर. प्रेमदासाच्या मैदानात रंगणारी ही लढत दोन्ही संघासाठी 'करो वा मरो' अशीच आहे. दुसऱ्या गटातून इंग्लंडच्या संघाने सेमीफायनमधील प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी उर्वरित एका जागेसाठी श्रीलंका-न्यूझीलंड दोन्ही संघ पाकिस्तानला बाहेर काढून आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी जोर लावतील. इथं जाणून घेऊयात कधी,  कुठं आणि कसा शिजणार पाकिस्तानला बाहेर काढण्याचा डाव?  या निकालामुळे पाकिस्तानच्या आशा कशा संपुष्टात येतील, यासंदर्भातील सविस्तर माहिती. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

श्रीलंकेसाठी शेवटची संधी!  

सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेच्या संघाला इंग्लंडच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता उर्वरित दोन पैकी एक सामना जरी गमावला तरी  ते स्पर्धेतून बाहेर होतील. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची लढत त्यांच्यासाठी स्पर्धेतील आव्हान टिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या सामन्यासह पाकिस्तानला पराभूत करून ते ४ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतात. 

T20 World Cup 2025 : टीम इंडिया 'जर तर'च्या समीकरणात, पाकिस्तानची अवस्था त्यापेक्षाही बिकट

श्रीलंकेच्या संघाला फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज

भारतीय खेळपट्टीच्या तुलनेत श्रीलंकन मैदानातील परिस्थितीत फलंदाजांसाठी प्रतिकुल असल्याचे दिसते. घरच्या मैदानातील आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेला मागील सामन्यातील चुका सुधारून मैदानात उतरावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर  श्रीलंकन फलंदाजांच्या शॉट सिलेक्शनचा मुद्दा चर्चेत आला होता. न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा चुकांची पुनरावृत्ती झाली तर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर येईल.

.... न्यूझीलंड संघ या गटात अव्वल ठरेल

पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात एक गुण जमा आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावला तरी त्यांना एक संधी असेल. पण यासाठी इंग्लंड विरुद्धचा अखेरचा सामना जिंकून श्रीलंकेनं पाकिस्तानला पराभूत करावे, याची त्यांना प्रार्थना करावी लागेल. याउलट श्रीलंका आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या उर्वरित दोन्ही लढती जिंकत त्यांना आपल्या गटात अव्वलस्थानी पोहचण्याची संधी असेल.  
 
न्यूझीलंडची ताकद

न्यूझीलंडच्या संघात कर्णधार मिचेल सँटनरसह श्रीलंकन फलंदाजीवर अंकूश ठेवणारे फिरकीपटू आहेत. फलंदाजीत फिन एलन आणि टिम सिफर्ट न्यूझीलंडची ताकद आहे. त्यात रचिन रविंद्र चालला तर न्यूझीलंडचा काम आणखी सोपे होईल. 

NZ vs SL यांच्यातील सामना कुठं आणि कधी रंगणार? कसा पाहता येईल हा सामना?

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील टी२० वर्ल्ड कप २०२६ सुपर ८ फेरीतील सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरसह जिओहॉटस्टारवर क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. 

 श्रीलंकेचा संघ 

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसंका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस, कमिंडु मेंडिस, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, जेनिथ लियानागे, पवन रथनायके, दुनिथ वोल्लालागे, महिश तीक्षणा, दुशमंथा चमीरा, मथीशा पथिराना, इशान मलिंगा

न्यूझीलंडचा संघ 

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, लोकी फर्ग्‍यूसन, मॅट हेन्री, काइल जेमीसन, डेरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सिफर्ट, ईश सोढी, कोल मॅककांची.

Web Title : NZ vs SL: टी20 विश्व कप से पाकिस्तान को बाहर करने की जंग

Web Summary : टी20 विश्व कप में न्यूजीलैंड और श्रीलंका का महत्वपूर्ण मुकाबला, लक्ष्य पाकिस्तान को पीछे छोड़ना। श्रीलंका को जीवित रहने के लिए जीत जरूरी, न्यूजीलैंड की नजरें ग्रुप में दबदबा बनाने पर। मुख्य खिलाड़ी और मैच विवरण।

Web Title : NZ vs SL: Battle to oust Pakistan from T20 World Cup

Web Summary : NZ and SL clash in a must-win T20 World Cup match, aiming to surpass Pakistan. Sri Lanka needs a win to stay alive, while New Zealand eyes group dominance. Key players and match details revealed.