हरारेच्या मैदानात शेवटच्या षटकात थरार! न्यूझीलंडनं जिंकली आफ्रिकेच्या बाजूनं झुकलेली फायनल

मॅट हेन्रीचं 'चमत्कारी' षटक; ६ विकेट्स हाती असताना दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या षटकात गमावला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 23:11 IST2025-07-26T23:06:10+5:302025-07-26T23:11:55+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs SA 20I Tri Series 2025 Final Matt Henry guides New Zealand to T20 tri-series title win over South Africa | हरारेच्या मैदानात शेवटच्या षटकात थरार! न्यूझीलंडनं जिंकली आफ्रिकेच्या बाजूनं झुकलेली फायनल

हरारेच्या मैदानात शेवटच्या षटकात थरार! न्यूझीलंडनं जिंकली आफ्रिकेच्या बाजूनं झुकलेली फायनल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यजमान झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील तिरंगी टी-२० मालिकेतील अंतिम सामना हरारेच्या मैदानात खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याला पसंती दिली. पण धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात हातात आलेला सामना त्यांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावून घेत न्यूझीलंडनं या सामन्यासह ट्रॉफीवर नाव कोरले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मॅट हेन्रीचा चमत्कार; ६ विकेट्स हाती असताना दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या षटकात गमावली मॅच

फायनल सामन्यात  न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १८० धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर १८१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या षटकापर्यंत सामन्यावर वर्चस्व ठेवले. पण अखेरच्या षटकात ६ विकेट्स हातात असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७ धावा निघाल्या नाहीत. मॅट हेन्रीनं 'चमत्कारी' षटकासह न्यूझीलंडच्या संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्याने या षटकात फक्त ३ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. 

IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा

न्यूझीलंडकडून या तिघांनी बॅटिंगमध्ये दाखवली धमक

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर सीफर्ट आणि कॉन्वे जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. सीफर्ट ३० धावा करून तंबूत परतल्यावर कॉन्वेनं ४७ धावांची महत्त्वूर्ण खेळी केली. या दोघांशिवाय रचिन रवींद्र याने ४७ धावांची खेळी केली.

बेबी एबी मैदानात होता, पण...

धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून प्रीटोरियस आणि हेंड्रिक्स या सलामी जोडीनं ९२ धावांची सलामी दिली. प्रीटोरियस ५१ धावांवर बाद झाल्यावर हेंड्रिक्सही ३७ धावा करून तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १३२ धावा लावल्या होत्या. त्यामुळे या सामना त्यांच्या हातात होता. अखेरच्या षटकात ६ विकेट्स हातात असताना ७ धावांची गरज असताना डेवाल्ड ब्रेविसही मैदानात होता. पण तो मोठा फटका मारण्याचा नादात आउट झाला अन् सामना न्यूझीलंडच्या बाजूनं फिरला.

शेवटच्या सामन्यात अशी फिरली मॅच

अखेरच्या षटकात सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकला असताना सँटरनरनं चेंडू मॅट हेन्रीच्या हाती सोपवला. या षटकात सेट झालेला बॅटर डेवॉल्ड ब्रेविस स्ट्राइकवर होता. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर त्याने मोठा फटका खेळला अन् दक्षिण आफ्रिकेनं महत्त्वाची विकेट गमावली. तिसऱ्या चेंडूवर कॉर्बिन बॉशनं दोन धावा घेतल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर १ धाव घेतल्यावर लिंडे स्ट्राइकवर आला. अखेरच्या २ चेंडूत ४ धावांची गरज असताना हेन्रीनं लिंडेला बाद केले. अखेरचा चेंडू निर्धाव टाकत त्याने संघाला ३ धावांनी विजय मिळवून दिला.

Web Title: NZ vs SA 20I Tri Series 2025 Final Matt Henry guides New Zealand to T20 tri-series title win over South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.