Join us
Daily Top 2Weekly Top 5

NZ vs PAK : सुपर ८ मधील पहिल्या सामन्यावर पावसानं फेरलं पाणी! पाक-न्यूझीलंडचं सेमीचं गणित बिघडणार?

पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग घेतली, पण स्ट्राईक पावसाने घेतलं अन् शेवटी सामना रद्द करण्याची वेळ आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 21:35 IST

Open in App

 New Zealand Pakistan Share Points After Abandoned Match T20 World Cup Super 8 : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर नियोजित सुपर ८ फेरीतील पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील सामना अखेर पावसामुळे 'वॉशआउट' झाल्याचे घोषित करण्यात आले. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. कोलंबोच्या मैदानातील सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण स्ट्राईक पावसाने घेतलं अन् शेवटी सामना रद्द करण्याची वेळ आली. पहिलाच सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे दोन्ही संघांना याचा मोठा फटका बसू शकतो.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

PAK अन् NZ  दोन्ही संघ बॅकफूटवर, कारण...

सुपर ८ मधील दुसऱ्या गटात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याशिवाय श्रीलंका आणि इंग्लंड हे दोन संघ आहेत. या गटातून अव्वल दोन संघ सेमीचं तिकीट पक्के करतील. पहिल्याच सामन्यात पावसाचा फटका बसल्यामुळे आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ बॅकफूटवर गेले आहेत.  सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघासाठी उर्वरित प्रत्येक सामना 'करो वा मरो'ची लढत असेल. याउलट इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन संघ फायद्यात असतील.   

ICC Rain-Affected Matches Rules Explained : पावसाची बॅटिंग अन् प्रत्येकी ५ षटकांचा गेम! समजून घ्या 'हा' नियम

पाकिस्तान न्यूझीलंडसाठी कसे असेल सेमीचं समीकरण?

दोन्ही संघांच्या खात्यात आता प्रत्येकी १-१ गुण जमा झाला आहे. उर्वरित दोन सामने जिंकून हे संघ ५ गुणांपर्यंत पोहचू शकतात. बहुतांशवेळा सुपर ८ साठी एवढे गुण पुरेसे ठरतात. पण उर्वरित दोन पैकी एक पराभव म्हणजे स्पर्धेतील प्रवास जवळपास संपुष्टात येईल. कारण एक पराभव आणि एक विजय मिळवला तर फक्त या दोन्ही संघांना ३ गुणांपर्यंत मजल मारता येईल. या परिस्थितीत या गटात दोन विजय मिळवून ४ गुण मिळवणारा संघही त्यांच्या पुढे निघून जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rain washes out NZ vs PAK Super 8 match; Semis hopes hit.

Web Summary : The New Zealand vs Pakistan Super 8 match was abandoned due to rain. Both teams get one point each. Pakistan won the toss and chose to bat, but the rain intervened, ruining the match and impacting both teams' chances for the semi-finals.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६पाकिस्तानन्यूझीलंडआयसीसी