Join us

NZ vs IND : पहिल्याच दिवशी भारताचा संघ २६३ धावांवर ऑल आऊट

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:18 IST

Open in App

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघावर पहिल्याच दिवशी २६३ धावांमध्ये ऑल आऊट होण्याची वेळ आली आहे. यावेळी भारताच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.

वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ भटकंतीसाठी गेला होता. त्यांच्या या भटकंतीचे फोटो चांगलेच वायरल झाले होते. पण सुट्टी एन्जॉय केल्यानंतर मात्र भारतीय संघाला मैदानात चमक दाखवता आलेली नाही. हनुमा विहारीने शतक आणि चेतेश्वर पुजाराने ९३ धावा केल्यामुळेच भारतीय संघाला ही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात सपशेल अपयश आले आहे. 

या सामन्यात पृथ्वी शॉ ही भोपळाही फोडू शकला नाही तर सलामीवीर मयांक अगरवालला एकाच धावावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर शुबमन गिल, वृद्धिमान साहा आणि आर. अश्विन हे शून्यावर तंबूत परतले. मयांक आणि पुजारा यांची यावेळी भारताचा डाव सावरला. मयांकने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १०१ धावा केल्या. शतकानंतर त्याला निवृत्ती घ्यावी लागली. पुजाराने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९३ धावा केल्या, त्याचे शतक फक्त सात धावांनी हुकले. आता भारताचा संघ सराव सामन्यात न्यूझीलंड इलेव्हन संघाला किती धावांत तंबूत पाठवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचेतेश्वर पुजारापृथ्वी शॉशुभमन गिल