England vs New Zealand, 49th Match : रेहान अहमद आणि विल जॅक्सच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने हातून निसटलेला सामना जिंकत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला. न्यूझीलंडच्या संघाला सेमीचं तिकीट पक्के करण्यासाठी १६० धावांचा बचाव करायचा होता. रचिन रवींद्रच्या फिरकीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. पण १८ व्या षटकात ग्लेन फिलिप्सनं २२ धावा खर्च केल्या आणि मॅच इंग्लंडच्या बाजूनं फिरली. या सामन्यातील विजयासह इंग्लंड सुपर ८ मधील लढतीत सर्वच्या सर्व ३ लढती जिंकत दुसऱ्या गटात अव्वलस्थानी पोहचला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सेमीच्या शर्यतीत न्यूझीलंडचा संघ वेटिंगवर; पाकिस्तान 'व्हेंटिलेट'वर; कारण...
दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा संघ सुपर ८ मधील दुसऱ्या गटातील गुणतालिकेत अजूनही दुसऱ्या स्थानावर असून ते सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढतीनंतर या गटातून सेमीत कोण एन्ट्री मारणार ते निश्चित होईल. न्यूझीलंडचा संघाने इंग्लंडविरुद्धचा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार केला. उत्तम धावगती ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळेच या पराभवानंतरही ते सेमीत प्रवेश करू शकतात. सेमीच्या शर्यतीत ते वेटिंगवर आहेत. पण पाकिस्तानचा संघालाही संधी असली तरी त्यांना श्रीलंकेविरुद्धची लढत नुसती जिंकायची नाही तर हा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्यामुळेच ते व्हेटिंलेटवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोण आहे Brian Bennett? झिम्बाब्वेच्या पठ्ठ्यानं 'विराट' कामगिरीसह मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला धक्क्यावर धक्के
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मॅट हेन्रीनं पहिल्या षटकात फिल सॉल्टला अवघ्या २ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकात जोस बटलरच्या रुपात लॉकी फर्ग्युसन याने आपले खाते उघडत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. संघाच्या धावफलकावर फक्त २ धावा असताना इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर माघारी फिरले होते. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर इंग्लंडच्या नजरा या पुन्हा एकदा कर्णधार हॅरी ब्रूकवर खिळल्या होत्या. त्याने जेकब बेथलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ४८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी डोकेदुखी ठरेल, असे वाटत असताना ग्लेन फिलिप्सनं हॅरी ब्रूकच्या रुपात न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले. हॅरी ब्रूक २४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांवर बाद झाला. रचिन रविंद्र याने जेकब बेथल याच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने १६ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सनं अप्रतिम झेल टिपत संघाला चौथी विकेट मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सॅम कुरेनच्या रुपात इंग्लंडने पाचवी विकेट गमावली. त्याने २२ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले.
एका ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या हातात असलेली मॅच इंग्लंडच्या बाजूनं फिरली
संघाच्या धावफलकावर ११७ धावा असताना टॉम बँटन २४ चेंडूत ३३ धावा करुन माघारी फिरला. अखेरच्या १८ चेंडूत इंग्लंडच्या संघाला ४३ धावांची आवश्यकता होती. रेहान अहमद आणि विल जॅक्स यांनी १६ चेंडूत ४४ धावांची भागीदारी करत हा सामना इंग्लंडला जिंकून दिला. ग्लेन फिलिप्स घेऊन आलेल्या १८ व्या षटकात २२ धावा आल्या अन् तिथं न्यूझीलंडच्या हातात असलेला सामना इंग्लंडच्या बाजूनं फिरला. विल जॅक्सनं १८ चेंडूत ३२ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय रेहमान अहमद याने ७ चेंडूत १९ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंडच्या संघाने सेट केलं होतं १६० धावांचे टार्गेट
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Santner) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टिम सिफर्ट आणि फिन एलन यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ चेंडूत ६४ धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र अदिल राशीद (Adil Rashid) याने सिफर्टला (२५ चेंडूंत ३५) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर फिन एलन (१९ चेंडूंत २९) हा विल जॅक्सच्या Will Jacks च्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. ग्लेन फिलिप्सने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी करत न्यूझीलंडकडून सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. परिणामी न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १५९ धावा करत इंग्लंडसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडकडून अदिल राशीद, विल जॅक्स आणि रेहमान अहमद यांनी प्रत्येकी २ तर लायम डॉसन (Liam Dawson) याने १ विकेट घेतली. विशेष म्हणजे इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्यांदाच चार फिरकीपटूंनी मिळून तब्बल १६ षटके गोलंदाजी केली. या चौघांनीच ७ विकेट्सही घेतल्या.