क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू अशी ख्याती असलेल्या विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून थांबण्याचा मोठा निर्णय घेतला. ३६ वर्षीय कोहली किमान तीन-चार वर्षे तरी कसोटीसह वनडेत अगदी सहज खेळू शकेल, असे अनेकांना वाटत होते. पण हे सर्व अंदाज आता फोल ठरले आहेत. विराट कोहली आता फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे सामन्यात खेळताना दिसेल. त्याच्या या मोठ्या निर्णयासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड जवळपास सेफ झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन तेंडुलकरचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी आव्हानात्मक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. २०० कसोटी सामन्यात सचिन तेंडुरनं ५१ शतके झळकावली आहेत. याशिवाय ४६३ वनडेत त्याच्या नावे ४९ शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे करणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. विराट कोहली या विक्रमाचा वेगाने पाठलाग करतानाही दिसले. पण कसोटीतील निवृत्ती घेतल्यावर त्याच्यासाठी हा डाव साधणं कठीण झाले आहे.
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
१८ नंबर जर्सी अन् १८ शतकांच गणित जुळणं 'मुश्किल'च
विराट कोहलीनं आपल्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५५० सामन्यात ८२ शतके झळकावली आहेत. शतकांच शतक साजरे करण्यासाठी अजून त्याला १८ शतकांची आवश्यकता आहे. कसोटी आणि वनडेत मिळून तो हा डाव अगदी सहज साधू शकला असता. पण एका निर्णयामुळे त्याने आपल्यासमोरील सोपी गोष्ट खूप अवघड करून ठेवलीये. फक्त वनडेच्या माध्यमातून हा महारेकॉर्ड मोडणं खूपच कठीण आहे. टी-२० च्या जमान्यात वनडे सामन्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यात कोहली या फॉर्मेटमध्ये किती काळ खेळणार तेही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला त्याचा जो मूड दिसतोय ते पाहता आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा ठरू शकते. एवढ्या वेळात शंभर शतकांचा डाव साधणे शक्य नाही.