Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार, अंबाती रायुडूची खरमरीत टीका

निवडीवर रायुडूने ट्विटरवरून खरमरीत टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:28 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा विश्वचषकासाठी पंधरा सदस्यीय संघ जाहीर झाला. या संभाव्य संघात चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडूला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण निवड समितीने मात्र अंबाती रायुडूला डावलले. रायुडू या गोष्टीमुळे निराश झाला आहे. या निवडीवर रायुडूने ट्विटरवरून खरमरीत टीका केली आहे.

निवड समितीने चौथ्या स्थानासाठी केदार जाधव आणि विजय शंकर यांची निवड केली आहे. रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. रायुडूच्या तुलने कमी अनुभव असूनही केदार आणि विजय शंकर यांची चौथ्या स्थानावर निवड करण्यात आल्याने रायुडू नाराज झाला आहे. विजय शंकर आतापर्यंत फक्त 9 एकदिवसीय सामने खेळला असला तरी त्याला संघात घेत त्यांनी रायुडूचा पत्ता कापला आहे.

संघात निवड झाल्यानंतर काही वेळ रायुडू हा शांत होता. पण आज दुपारी मात्र त्याने ट्विटरच्या माध्यमातून निवड समितीवर टीका केली आहे. टीका करताना रायुडू म्हणाला की, " आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार आहे." ही टीका करताना रायुडूला सांगायाचे आहे की, विश्वचषकातील संघात माझी निवड केली नाही. पण मी विश्वचषकात खेळतो आहे, हा आभास निर्माण करण्यासाठी मी आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार असल्याचे रायुडूने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

हे पाहा रायुडूचे ट्विट

तेंडुलकरपेक्षा चांगली सरासरी तरी रायुडूला का वगळले, आयसीसीचा सवाल

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) पाच सदस्यीय निवड समितीने सोमवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक हे अनपेक्षित चेहरे संघात पाहायला मिळाले, तर रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांना डच्चू देण्यात आला. बीसीसीआयने  संघ जाहीर केल्यानंतर काही वेळातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) रायुडूला का वगळले, असा सवाल केला.

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) पाच सदस्यीय निवड समितीने सोमवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक हे अनपेक्षित चेहरे संघात पाहायला मिळाले, तर रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांना डच्चू देण्यात आला. बीसीसीआयने  संघ जाहीर केल्यानंतर काही वेळातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) रायुडूला का वगळले, असा सवाल केला.  

 

निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी त्यांनी शंकरला का निवडले हेही सांगितले. ते म्हणाले,'' चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीसाठी अनेक पर्याय वापरून पाहिले. त्यात दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांचा समावेश होता. त्याशिवाय आम्ही अंबाती रायुडूलाही अनेक संधी दिल्या, परंतु विजय शंकरचा आम्ही अष्टपैलू म्हणून वापर करू शकतो.

टॅग्स :अंबाती रायुडूवर्ल्ड कप २०१९