Irfan Pathan Removed IPL Commentary Panel 2025 Because Of Hardik Pandya : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाण याने निवृत्तीनंतर समालोचकाच्या रुपात आपली ओळख निर्माण केलीये. क्रिकेटच्या मैदानातील गोलंदाजीनंतर त्याने आपल्या 'बोलंदाजी'च्या जोरावर चांगला चाहतावर्ग कमावला आहे. पण समालोचन करत असताना लोकप्रिय क्रिकेटरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणं त्याला चांगलेच महागात पडलं आहे. त्यामुळेच IPL 2025 स्पर्धेत तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला नाही. कॉमेंट्री पॅनलमधून त्याचे नाव गायब करण्यामागे विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार खेळाडूंचा हात असल्याची चर्चा रंगली होती, पण आता खुद्द इरफान पठाणच्या एका वक्तव्यातून यामागचा खरा सूत्रधार कोण होता ते समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिक पांड्याच खरा सूत्रधार
इरफान पठाण याने 'लल्लनटॉप'ला दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावेळी अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी इरफान पठाण याला IPL २०२५ च्या हंगामात कॉमेंट्री पॅनलमधून नाव हटवण्यामागे कुणाचा हात होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याने थेट नाव घेतले नसले तरी, या प्रश्नावर त्याने दिलेला रिप्लाय हा हार्दिक पांड्याच त्यामागचा खरा सूत्रधार होता, याची पुष्टी होते.
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
तो माझ्या कामाचा भाग, कुणाशीही वैयक्तिक दुश्मनी नाही
IPL मधील १४ सामन्यात मी फक्त ७ मॅचमध्ये एखाद्यावर टीका करतो. याचा अर्थ मी खेळाडूचा समाचार घेत असलो तरी माझी भाषा अन् पवित्रा हा एकदम सौम्य असतो. हा माझ्या कामाचा भाग आहे, असे म्हणत त्याने हार्दिक पांड्यासह बडोदाकडून खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही, असेही सांगितले. दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या किंवा हार्दिक पांड्या यापैकी एकही खेळाडू मी आणि भाऊ युसूफ पठाण याने मदत केलेली नाही, असे छाती ठोकपणे सांगू शकणार नाही, असा दावाही यावेळी इरफान पठाण याने केलाय.
गावसकर-तेंडुकर यांच्यावरही टीका झालीये, पण...
इरफान पठाण याने यावेळी दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा दाखला दिला. ज्यावेळी तुम्ही क्रिकेटच्या मैदानात उतरता त्यावेळी खराब कामगिरीनंतर टीकाही होणारच. सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकही यातून सुटलेले नाहीत. या दिग्गजांनी परिस्थिती कशी हाताळली ते सध्याच्या क्रिकेटर्संनी शिकले पाहिजे, असेही तो म्हणाला.
Web Title: Not Rohit Sharma Or Virat Kohli Irfan Pathan Confirmed That He Was Removed From IPL Commentary Panel 2025 Because He Criticized Hardik Pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.