Join us

CSK New Captain : रवींद्र जडेजा नव्हे, तर 'हा' खेळाडू व्हायला हवा MS Dhoniनंतर CSKचा कर्णधार; वीरेंद्र सेहवागनं सुचवलं नाव

महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली. पण, ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळाल्यानंतर जडेजाकडून ती जबाबदारी पुन्हा धोनीकडेच आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 16:55 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) कर्णधार बदलाचा खेळ खेळला... महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली. पण, ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळाल्यानंतर जडेजाकडून ती जबाबदारी पुन्हा धोनीकडेच आली. आता पुढील पर्वात नेतृत्व जडेजाकडे दिले जाण्याची शक्यता फार कमी आहे आणि अशात फ्रँचायझीला धोनीचा उत्तराधिकारी शोधावा लागणार आहे. धोनी पुढील पर्वात खेळाडू म्हणून दिसेल, याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे CSK ला संघातल्या कोणालातरी कर्णधार बनवावं लागणार आहे.  

चेन्नई सुपर किंग्सचा सध्याचा संघ पाहिल्यास एक खेळाडू धोनीची यशस्वी घोडदौड पुढे घेऊन जाण्याची क्षमता राखतो आणि तो म्हणजे ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad). भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag ) याने हा विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला,'' ऋतुराज महाराष्ट्राचा कर्णधार आहे. तो संयमाने खेळतो. शतक झळकावल्यानंतरही तो त्याची शिस्त विसरत नाही. तो शून्यावर बाद झाला, तरी तसाच राहतो. शतक मारल्यानंतरचा आनंद आणि शून्यावर बाद झाल्याचे दुःख तो चेहऱ्यावर कधी दिसू देत नाही. तो संयमी आहे. एक चांगला कर्णधार होण्यासाठी लागणाऱ्या सर्व क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे कोणाला गोलंदाजी द्यायला हवी, फलंदाजीच्या क्रमवारीत कोणता बदल करायला हवा, याची कल्पना त्याला आहे.''

पण, फक्त एकच गोष्ट ऋतुराजच्या बाजूने नाही आणि ती म्हणजे अनुभव... CSK कडून त्याने काही वर्षांपूर्वीच खेळण्यास सुरुवात केली आहे. तो भारतीय संघाचा नियमित सदस्यही नाही, परंतु तरीही सेहवागला त्यात महेंद्रसिंग धोनीचा खरा उत्तराधिकारी दिसतो. क्रिकबजशी बोलताना सेहवाग म्हणाला,''आयपीएलचे एक पर्व कुणीही चांगलं खेळू शकतं, परंतु तो ३-४ पर्व चांगला खेळला, तर तो धोनीनंतर CSKचा दीर्घकालीन कर्णधार बनू शकतो. धोनीला आपण चांगला कर्णधार का म्हणतो?; कारण, तो शांत आहे, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि गोलंदाज व फलंदाजांचा चांगला उपयोग करून घेतो. धोनी धाडसी कर्णधार आहे आणि म्हणून त्याला नशिबाची साथ मिळते. ऋतुराजकडे या सर्व गुण आहेत, एक सोडल्यास... त्याच्या लक फॅक्टरबाबत मला खात्री नाही.''

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सविरेंद्र सेहवागरवींद्र जडेजाऋतुराज गायकवाड
Open in App