Join us

Video : हा तर बद्धकोष्ठावर हमखास इलाज; वीरूने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहिलात का?

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह असतो... सोशल मीडियावरील त्याची प्रत्येक पोस्ट ही मजेशीर असतेच...  त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 18:35 IST

Open in App

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह असतो... सोशल मीडियावरील त्याची प्रत्येक पोस्ट ही मजेशीर असतेच...  त्यामुळे वीरूनं सोशल मीडियावर आज काय पोस्ट केली आहे, याची साऱ्यांनाच उत्सुकता असते. वीरूनं स्वतःची एक वेगळी शैली तयार केली आहे आणि त्यामुळे त्याच्या पोस्ट मजेशीर वाटतात... आताही वीरूच्या फेसबूक पोस्टची चर्चा रंगली आहे. वीरूनं त्याच्या फेसबूक व इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पहिल्यांदा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही दचकाल, घाबराल... पण, तो व्हिडीओ फार मजेशीर आहे..

आपल्या पिकाचं पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी शेतात बुजगावणं उभं करतो आणि वीरूनं पोस्ट केलेल्या व्हिडीओतही बुजगावणंच आहे. पण, हा देसी जुगाड अनेकांना थक्क करत आहे. एका शेतकऱ्यानं तारांच्या स्प्रिंगला हे बुजगावणं अशा पद्धतीनं जोडलं आहे की ते सतत हलतं राहतं आणि पहिल्यांदा त्याकडे पाहणारा कोणीही घाबरेल अशी वेशभुषा त्याला देण्यात आली आहे. वीरूची त्या व्हिडीओवरील पोस्टही भन्नाट आहे. त्यानं लिहिलं की, हा फक्त बुजगावणं नाही, तर हा तर बद्धकोष्ठावर हमखास इलाज आहे.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :विरेंद्र सेहवागजरा हटके