Join us

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन   

Smriti Mandhana : सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी इंग्लंडची टॅमी बीयूमोंट, दक्षिण आफ्रिकेची लिझली ली, भारताची स्मृती मानधना आणि आयर्लंडची गॅबी लुईस या चौघी शर्यतीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:42 IST

Open in App

दुबई : आयसीसीकडून वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिला नामांकन दिले गेले आहे. तर पुरुष क्रिकेटपटूंच्या नामांकनात भारताच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही.

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी इंग्लंडची टॅमी बीयूमोंट, दक्षिण आफ्रिकेची लिझली ली, भारताची स्मृती मानधना आणि आयर्लंडची गॅबी लुईस या चौघी शर्यतीत आहेत. पुरुष क्रिकेटपटूंच्या पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या नामांकनात पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी व मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. त्यांना इंग्लंडचा कर्णधार जो रूट व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांची टक्कर मिळणार आहे.

टॅग्स :स्मृती मानधना
Open in App