Join us

Jos Buttler Smart Answer, IPL 2022: जीव धोक्यात असेल तर प्राण वाचवण्यासाठी कोणत्या फलंदाजाला बॅटिंगसाठी निवडशील? जोस बटलर म्हणतो...

ना विराट, ना रोहित, ना सचिन... या भारतीय फलंदाजाला दिली पसंती, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:59 IST

Open in App

Jos Buttler Smart Answer, IPL 2022: भारतात सध्या IPL ची धूम सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांसह एकूण १० संघांमध्ये यंदाची विजेतेपदाची स्पर्धा रंगली आहे. स्पर्धेत भारताचा लोकेश राहुल आणि इंग्लंडचा जोस बटलर हे दोन फलंदाज तुफान फॉर्मात आहेत. जोस बटलरने स्पर्धेतील ८ सामन्यात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात तीन दमदार शतकांचा समावेश आहे. असे असताना, अश्विनच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मात्र जोस बटलरचा दिग्गज भारतीय फलंदाजावर असलेला विश्वास दिसून आला.

जोस बटलर आणि आर अश्विन हे एकेकाळचे मैदानातील शत्रू सध्या राजस्थान रॉयल्स संघात एकत्र खेळत आहेत. अश्विनने नुकताच जोस बटलरची एक छोटीशी मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने बटलरला प्रश्न विचारला की, जर तुला जीव धोक्यात असेल आणि तुला तुझा वाचवण्यासाठी एका फलंदाजाला निवडायचे असेल, तर तू कोणाची निवड करशील? बटलरनेदेखील क्षणाचा विलंब न लावता भरवशाचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) याचं नाव घेतलं.

सर्वसामान्यपणे, फलंदाजीबाबत विषय झाल्यास विराट कोहली, रोहित शर्मा किंवा सचिन तेंडुलकर यांचं नाव जास्त घेतलं जातं. त्यामुळे राहुल द्रविडचं नाव का घेतलं, याचं कारणही त्याने सांगितलं. 'राहुल द्रविड हा 'द वॉल' या नावाने ओळखला जातो. त्याची फलंदाजी अभेद्य आहे. त्यामुळे तो पूर्ण दिवसभर फलंदाजी करू शकतो याचा मला विश्वास आहे', असं स्मार्ट उत्तर त्याने दिलं.

टॅग्स :आयपीएल २०२२राहुल द्रविडविराट कोहलीजोस बटलररोहित शर्मा
Open in App