नवी दिल्ली - भारताचा अनुभवी फलंदाज लोकेश राहुलने कबूल केले की, त्याच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मात्र, अद्याप निवृत्तीसाठी काही काळ बाकी असल्याचे सांगत, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण त्यास उशीर करणार नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनसोबतच्या संवादात राहुलने आपल्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. तो म्हणाला, ‘निवृत्ती घेणे हा माझ्यासाठी कठीण निर्णय नसेल, कारण क्रिकेटपलीकडेही आयुष्य आहे. मी निवृत्तीबाबत विचार केला आहे. मला वाटत नाही की हा निर्णय घेणे इतके कठीण असेल. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, तर जेव्हा वेळ येईल तेव्हा ती टाळण्यात काही अर्थ उरणार नाही. अर्थात, याला अजून काही वेळ लागेल.’
राहुल स्वतःला ‘सुपरस्टार’ न मानण्यावर भर देत म्हणाला, ‘तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा आनंद घ्या. तुमचे कुटुंबही आहे, त्यामुळे तुम्हाला जे आवडते तेच करा. मी स्वतःला हे समजावण्याचा प्रयत्न करतो की मी खूप महत्त्वाचा नाही. आपल्या देशात आणि जगभरात क्रिकेट सुरूच राहणार आहे.’
Web Summary : Lokesh Rahul admits considering retirement but feels it's premature. He emphasizes enjoying the present and acknowledges life beyond cricket. He believes honesty is key when the time comes, but that's still distant. Rahul prioritizes family and understands cricket's continuity regardless of individual players.
Web Summary : लोकेश राहुल ने संन्यास पर विचार करने की बात स्वीकार की, पर कहा कि अभी समय नहीं आया है। उन्होंने वर्तमान का आनंद लेने और क्रिकेट से परे जीवन को स्वीकार किया। राहुल का मानना है कि जब समय आएगा तो ईमानदारी महत्वपूर्ण है, लेकिन अभी दूर है। वह परिवार को प्राथमिकता देते हैं।