Join us  

शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

भारताच्या चार खेळाडूंची केली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:02 PM

Open in App

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा चाहत्यांसाठी पर्वणीच.. त्यामुळे हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा भिडतात तेव्हा वातावरणातही आपसूकच गांभीर्य निर्माण होतं. भारत-पाकिस्तान सामन्यांनी नेहमी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे.  पण, उभय देशांमधील राजकीय तणावाच्या वातावरणामुळे भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका होत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेतच भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवायला मिळत आहे. 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ अखेरचे भिडले होते.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं नुकतंच भारत-पाकिस्तान यांच्यातील टॉप 10 वन डे क्रिकेटपटूंची निवड केली. रावळपिंडी एक्स्प्रेसनं जाहीर केलेल्या टॉप 10 खेळाडूंमध्ये भारताच्या चार जणांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यानं त्याच्या संघातून महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली या माजी कर्णधारांना स्थान दिलेले नाही.

अख्तरच्या या संघात सलामीला सचिन तेंडुलकर आणि सईद अन्वर यांना संधी देण्यात आली आहे. मधल्या फळीची जबाबदारी इंझमान-उल-हक, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यांच्याकडे, तर अष्टपैलू म्हणून अब्दुल रझाक व युवराज सिंग यांची निवड केली आहे. गोलंदाजी विभागात अख्तरनं स्वतःसह साकलेन मुश्ताक, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना स्थान दिले आहे. रझाक, युवराज, सेहवाग आणि सचिन यांच्याकडे गोलंदाजीची अतिरिक्त जबाबदारी त्यानं सोपवली आहे.  

अख्तरच्या या संघात भारत-पाकिस्तानच्या अनेक दिग्गजांना स्थान मिळालेले नाही. भारताच्या बाबतीत बोलायचे तर धोनी व गांगुलीसह झहीर खान, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, विराट कोहली व रोहित शर्मा यांची नावं नाहीत. पाकिस्तानच्या बाबतीत शाहिद आफ्रिदी, जावेद मियादाँद, युनिस खान, मोहम्मद युसूफ आणि मिसबाह उल हक आदींना संधी मिळालेली नाही.

टॉप 10 - सचिन तेंडुलकर, सईद अन्वर, इंझमाम-उल-हक, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, अब्दुल रझाक, युवराज सिंग, साकलेन मुश्ताक, वसीम अक्रम, वकार युनिस.  

महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत! 

ICCची चार महत्त्वाच्या नियमांना मंजूरी; क्रिकेटमध्ये दिसतील 'हे' बदल

पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!

दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय; खासदार गौतम गंभीरचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'

टॅग्स :शोएब अख्तरमहेंद्रसिंग धोनीसौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरयुवराज सिंगराहूल द्रविडविरेंद्र सेहवाग