Join us

Nita Ambani Mumbai Indians, IPL 2022: निता अंबानींचा 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंना खास संदेश, वाचा काय म्हणाल्या...

मुंबईचा पुढचा सामना १३ एप्रिलला पंजाबशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 15:33 IST

Open in App

Nita Ambani Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या हंगामाची सुरूवात अतिशय वाईट झाली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबईने सुरूवातीचे चारही सामने गमावले. दारूण पराभव झालेल्या मुंबईची गुणतालिकेत अवस्थादेखील अतिशय वाईट आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने बंगळुरूविरूद्ध झालेला पराभव पचवणं संघासाठी खूपच कठीण असल्याचे सांगितले. याच दरम्यान मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये संघाच्या मालकीण निता अंबानी यांनी संघातील खेळाडूंना एक प्रेरणादायी संदेश दिला.

"मला तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्कीच पुढच्या सामन्यापासून दमदार कामगिरी कराल याची मला खात्री आहे. आता आपण जे झालं ते विसरून फक्त पुढे आणि गुणतालिकेत वर जाण्याची तयारी करूया. आपल्याला आपल्या स्वत:च्या कामगिरी विश्वास ठेवावा लागेल. आपण नक्कीच स्वत:ला सिद्ध करू", असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला.

"आपण अशा विचित्र आणि कठीण प्रसंगांतून अनेक वेळा गेलो आहोत. अशा परिस्थितीतून वर येत आपण विजेतेपदही मिळवलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सर्व जण एकमेकांना सहकार्य करत राहाल. आपली लवकरच भेट होईल. तोपर्यंत माझा तुम्हा सर्वांना पूर्ण पाठिंबा आहे. कोणीही निराश होऊ नका. स्वत:वर विश्वास ठेवा आणि खेळत राहा. मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन कायम तुमच्या सोबत आहे", असेही निता अंबानी म्हणाल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२नीता अंबानीमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App