Nicholas Pooran Angry Video: सनरायझर्स हैदराबादच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या लखनौ सुपर जाएंट्ला पराभूत केले. या पराभवासह रिषभ पंतच्या लखनौचा यंदाच्या हंगामातील प्रवासही संपुष्टात आला. लखनौच्या ताफ्यातून मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीसह निकोलस पूरनची धमाकेदार खेळी व्यर्थ ठरली. लखनौच्या डावानंतर शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या निकोलस पूरनचा अँग्री यंग मॅन अवतार पाहायला मिळाला. मॅच नंतर ड्रेसिंग रुममधील त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. तो एवढा का संतापला होता? ड्रेसिंग रूममध्ये पॅड फेकून त्याने कुणावर राग काढला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निकोलस पूरनची ड्रेसिंग रुममध्ये आदळा आपट
लखनौच्या डावातील अखेरच्या षटकात अब्दुल समद आणि निकोलस पूरन फलंदाजी करत होते. नितीश रेड्डी घेऊन आलेल्या षटकात दोन वाइडसह पहिल्या चेंडूवर लखनौला ८ धावा मिळाल्या होत्या. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर निकोलस पूरन दुहेरी धावा घेण्याच्या प्रयत्नात धाव बाद झाला. ड्रेसिंग रुममध्ये शेवटचे चेंडू तो अगदी शांत बसून बघत होता. पण अब्दुल समद बोल्ड झाल्यावर निकोल पूरन चांगलाच तापला. सोफ्यावरून उठून रागा रागाने त्याने पॅड ड्रेसिंग रुमच्या काचेवर आपटल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरतोय.
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
रनआउट झाल्याचा स्वत:सह अब्दुल समदवरही काढला राग
निकोलस पूरन याने २६ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. अब्दुल समदनं दुसऱ्या धावेसाठी नकार दिल्याचा मनात राग दाबून तो तंबूत परतला होता. पूरन बाद झाल्यावर अब्दुल समदने चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पाचव्या चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या रुपात LSG नं आणखी एक विकेट रन आउटच्या रुपात गमावली. अखेरचे दोन चेंडू शिल्लक असताना अब्दुल समदकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. पण तो नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. अन् निकोलस पूरन याने रन आउट झाल्याचा राग काढल्याचे पाहायला मिळाले.