BCCI-CSA announce fixtures for India’s Tour of South Africa 2023-24 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका ( CSA) यांनी भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक आज जाहीर केले. डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत भारतीय संघ ३ वन डे, ३ ट्वेंटी-२० आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, “ फ्रिडम सीरिज केवळ दोन उत्कृष्ट कसोटी संघ खेळत आहे म्हणून नव्हे, तर ती महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या दोन महान नेत्यांचा सन्मान आहे. बॉक्सिंग डे टेस्ट आणि न्यू इयर टेस्ट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमधील सर्वात महत्वाचे सामने आहेत. दक्षिण आफ्रिकेत भारताला नेहमीच भक्कम पाठिंबा मिळाला आहे.”
![]()
CSA चेअरपर्सन लॉसन नायडू म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या उत्कट चाहत्यांच्या आगमनाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. दोन्ही संघांसाठी हा एक महत्त्वाचा दौरा आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही देशांत अपवादात्मक प्रतिभा आहे आणि आम्ही रोमांचक क्रिकेट आणि रोमहर्षक सामन्यांची अपेक्षा करू शकतो.”
भारताचे वेळापत्रक
पहिली ट्वेंटी-२० - १० डिसेंबर, डर्बन
दुसरी ट्वेंटी-२० - १२ डिसेंबर, कॅबेर्हा
तिसरी ट्वेंटी-२० - १४ डिसेंबर, जोहान्सबर्ग
पहिली वन डे - १७ डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरी वन डे - १९ डिसेंबर, कॅबेर्हा
तिसरी वन डे - २१ डिसेंबर, पार्ल

पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, सेन्च्युरियन
दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी २०२४, केप टाऊन