Join us

५८ चेंडूंत नाबाद १०० धावा, पण केवळ १ चौकार! न्यूझीलंडच्या फलंदाजाचा ट्वेंटी-२०त चमत्कार

न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्तिल ( Martin Guptill ) याने बुधवारी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2023) अनोखा विक्रम नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 16:06 IST

Open in App

न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्तिल ( Martin Guptill ) याने बुधवारी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2023) अनोखा विक्रम नोंदवला. शतकी खेळीत केवळ १ चौकार मारणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या मार्टीनने बार्बाडोस रॉयल्सच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. त्याने ५८ चेंडूंत नाबाद शतक झळकावले अन् यात केवळ १ चौकार खेचला.  

 

  • निक व्हॅन डेन बर्ग - ३४ वर्षीय खेळडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम केला होता. नॉर्थ वेस्ट संघाकडून खेळताना त्याने २०१४ मध्ये नामिबियाविरुद्ध १०१ धावा केल्या होत्या आणि त्यात १२  षटकार व १ चौकार खेचला होता.
  • ख्रिस गेल - युनिव्हर्स बॉसने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना आयपीएलमध्ये २०१८साठी सनरायझर्स हैदराबादची धुलाई केली होती. त्याच्या १०४ धावांच्या खेळीत ११ षटकार होते, तर १ चौकार होता. 
  • विल यंग - न्यूझीलंडच्या फलंदाजाने सेंट्रल डिस्ट्रीक्टसंघाकडून २०२१मध्ये कॅनेरबरीविरुद्ध १०१ धावा चोपलेल्या आणि त्यात १० षटकार व १ चौकार होता.  
  • मार्टीन गुप्तिल - न्यूझीलंडच्या अनुभवी फलंदाजाने काल बार्बाडोस रॉयल्सविरुद्ध ५८ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या आणि त्यात ९ षटकार व १ चौकार होता. 

गुप्तिलच्या या खेळीच्या जोरावर नाईट रायडर्सने ५ बाद १९४ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार किरॉन पोलार्डने ३२ चेंडूंत ४६ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात रॉयल्सचा संघ १२.१ षटकांत ६१ धावांत तंबूत परतला. वकार सलामखेईलने ४, आंद्रे रसेलने ३, अकिल होसेनने २ आणि सुनील नरीनने १ विकेट घेतली. 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगकिरॉन पोलार्ड
Open in App