New Zealand vs South Africa T20 WC 1st Semi Final : आयसीसी विश्वचषक २०२६ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडसमोर यंदाच्या हंगामात अपराजित दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आव्हान असणार आहे. बुधवारी, ४ मार्चला कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकतील. यातील विजेता ८ मार्चला अहमदाबादच्या मैदानात रंगणाऱ्या अंतिम फेरीत धडक मारेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेचा विजयी सिलसिला!
दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. त्यांनी सातही सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. सुपर ८ फेरीत त्यांनी भारतावर ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला, वेस्ट इंडिजला ९ विकेट्सने मात दिल्यावर झिम्बाब्वेविरुद्ध थरारक विजय मिळवत त्यांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले.
न्यूझीलंडसमोर मोठा अडथळा, पण...
न्यूझीलंड संघाचा यंदाच्या हंगामातील प्रवास हा चढ-उताराचा राहिला आहे. गट फेरीत तीन विजय मिळवल्यावर सुपर ८ मधील पाकिस्तानविरुद्ध पावसामुळे रद्द झालेला सामन्यानंतर श्रीलंकेविरुद्ध उत्तम धावगतीसह मिळवलेल्या विजयासह त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यांना पराभवाचा दणका दिला होता. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. यात एकदाही त्यांना बाजी मारता आलेली नाही. त्यामुळेच अंतिम फेरी गाठण्याचे मोठे आव्हान न्यूझीलंडसमोर असेल. पण एक गोष्ट अशीही आहे जी न्यूझीलंडसाठी जमेची बाजू ठरू शकते. ICC स्पर्धेतील नॉकआउटमध्ये न्यूझीलंडच्या संघाने अनेकदा दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. ती गोष्ट ते पुन्हा करुन दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
बुमराहला पॉवरप्लेमध्येच आणा! गावसकरांचा टीम इंडियाला 'मास्टर प्लॅन'; इंग्लंडला रोखण्यासाठी बुमराहची ...
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील या खेळाडूंवर असतील नजरा
- एडन मार्करम (कर्णधार) ५३.६० च्या सरासरीसह २६८ धावा
- लुंगी एनिग्डी- १३ विकेट्स
- मार्को यान्सेन- न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी
या स्टार खेळाडूंवर असेल न्यूझीलंडची मदार
- टीम सिफर्ट-२१६ धावा
- रचिन रविंद्र- ९ विकेट्स, मध्यफळीतील फलंदाजीची मोठी भूमिका
सामना कधी अन् कुठं रंगणार?
- सामन्याची तारीख : बुधवार, ४ मार्च २०२६
- सामन्याची वेळ : सायं. ७:०० (नाणफेक ६:३० वाजता)
- सामन्याचे ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता
कसा पाहता येईल SA vs NZ यांच्यातील सामना
- टीव्हीवर थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइट
पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय?
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यासाठी ICC ने त्याच दिवशी अतिरिक्त ९० मिनिटांचा वेळ राखीव ठेवला आहे. पाऊस अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव या वेळेत सामना होऊ शकला नाही तर ५ मार्च हा राखीव दिवस आहे. जर त्या दिवशीही सामना झाला नाही, तर सुपर ८ गटात अव्वल राहिल्यामुळे दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत प्रवेश करेल.