ICC T20 World Cup 2026 England vs Scotland And New Zealand vs South Africa LIVE Streaming Details : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ट्रिपल हेडर लढतीत 'ड' गटात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 'नंबर वन'साठीचा सामना रंगणार आहे. गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या डबल सुपर ओव्हरमधील सामन्यातील रोमहर्षक विजयासह स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली होती. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही विजयी हॅटट्रिकचा डाव साध सुपर ८ च्या शर्यतीत अव्वलस्थानी विराजमान होण्यासाठी शड्डू ठोकेल. याशिवाय दुपारच्या सत्रात इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातील लढतीत मोठा उलटफेर होणार का? ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सातव्या दिवशी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लढतीसह होणारे सामने कधी आणि कुठं रंगणार? या सामने कसे पाहता येतील यासंदर्भातील सविस्तर माहिती
'डेथ ग्रुप'मधून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे सुपर ओव्हरमधील स्थान जवळपास निश्चित
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ड' गटातून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तानचा संघ सुपर ८ च्या शर्यतीत होता. दोन स्थानासाठी तिघांत तगडी फाईट अपेक्षित होती. पण डेथ ग्रुपमधील अफगाणिस्तानच्या संघाला दोन्ही संघांनी पराभूत केल्यामुळे या गटातून द. आफ्रिकेसह न्यूझीलंडचा संघ आगेकूच करेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता दोन्ही संघातील लढतीत 'नंबर वन' कोण ठरणार? ते पाहण्याजोगे असेल.
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड
- सामन्याचे ठिकाण- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- सामन्याची वेळ - सायंकाळी ७ वाजता
स्कॉटलंडचा संघ उलटफेर करणार?
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात दुपारच्या सत्रात स्कॉटलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना रंगणार आहे. 'ब' गटातील वेस्ट इंडिजच्या संघाने सलग दोन विजय नोंदवले असून स्कॉटलंड, इटली यांच्यानंतर इंग्लंडचा संघ २ सामन्यातील एका विजयासह चौथ्या स्थानावर आहे. या सामन्यात स्कॉटलंड इंग्लंडला धक्का देऊन यंदाच्या हंगामातील आणखी एक मोठा उलटफेर करणार की, इंग्लंड सुपर ८ चा मार्ग सुकर करणार ते पाहण्याजोगे असेल.
- इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड
- सामन्याचे ठिकाण- ईडन गार्डन्स, कोलकाता
- सामन्याची वेळ- दुपारी ३ वाजता.
'क' गटात आयर्लंड विरुद्ध ओमान यांच्यात पहिला सामन्यात दोन्ही संघ स्पर्धेतील पहिला सामना जिंकून आपले खाते उघडण्यासाठी मैदानात उतरतील. या गटात श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ सुपर ८ च्या शर्यतीत आहेत.
कुठे अन् कसे पाहता येतील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने?
टी २० वर्ल्ड कप २०२६ मधील सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. तर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.