Join us  

NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ ( 14) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सावरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 10:28 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ ( 14) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सावरले. पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनं ११वी धाव घेताच विक्रमाला गवसणी घातली. त्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला.

न्यूझीलंडचा पहिला डाव ३४८ धावांवर गुंडाळला. किवींनी पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी ५१ धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला न्यूझीलंडचे शेपूट झटपट गुंडाळण्याची संधी होती. पण, कॉलीन डी ग्रँडहोम आणि कायले जेमिसन यांनी ७१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. ग्रँडहोम ४३ धावा करून माघारी परतला. जेमिसनने ४५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४४ धावा चोपल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्टने टीम इंडियाच्या गोलंदाजांची चंपी केली. त्यानं २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ३८ धावा केल्या. इशांतने ६८ धावांत ५ फलंदाज बाद केले.  

दुसऱ्या डावात टीम इंडियाला ८व्या षटकात पहिला धक्का बसला. पृथ्वी शॉ ( १४)  ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या विकेटसाठी मयांकसह अर्धशतकी भागीदारी केली. चहापानापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा (११) बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. मयांक चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु साऊदीच्या चेंडूवर छेडण्याचा नाद त्याला भोवला. मयांक ५८ धावा करून माघारी परतला. कोहलीनं ११वी धाव घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये गांगुलीला मागे टाकले.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाजसचिन तेंडुलकर - १५९२१राहुल द्रविड - १३२६५सुनील गावस्कर - १०१२२व्हीव्हीएस लक्ष्मण - ८७८१वीरेंद्र सेहवाग - ८५०३विराट कोहली - ७२१६*सौरव गांगुली - ७२१२

टीम इंडियाला विजयासाठी करावा लागेल पाकिस्तानसारखा करिष्मा

कायले जेमिसनची ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल क्लार्कच्या विक्रमाशी बरोबरी

इशांत शर्माच्या पाच विकेट्स; मोडला कपिल देव अन् झहीर खानचा विक्रम

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीसौरभ गांगुलीसचिन तेंडुलकरराहूल द्रविडविरेंद्र सेहवाग