Join us

दोन संघ समाजकार्यासाठी खेळणार; दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणार

क्रिकेटनं जगभरातील लोकांना जवळ आणले आहे... जगभरात फुटबॉलनंतर क्रिकेटच असा खेळ आहे की तो सर्वाधिक पाहिला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 15:55 IST

Open in App

क्रिकेटनं जगभरातील लोकांना जवळ आणले आहे... जगभरात फुटबॉलनंतर क्रिकेटच असा खेळ आहे की तो सर्वाधिक पाहिला जातो. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनं प्रेक्षकसंख्येचे सर्व विक्रम मोडले. क्रिकेट हा सर्वांना मनसोक्त मनोरंजन देणारा खेळ झाला आहे. यात थरार आहे, नाट्य आहे, मनोरंजनासाठी जे काही हवं ते सर्व आहे. पण, हाच खेळ जेव्हा एका समाजकार्यासाठी एकवटतो, तेव्हा खरचं याची लोकप्रियता अधिक वाढते. अशाच एका समाजकार्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ मैदानावर उतरणार आहेत. त्यांच्या या पुढाकाराचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या मालिकेतील पहिला सामना एका समाजकल्याणासाठी निधी जमा करणार आहे. मार्च 2019मध्ये ख्राईस्टचर्च दहशतवादी हल्ल्यानं हादरलं होतं. या हल्ल्यात जवळपास 50 जण मृत्युमुखी पडले होते, तर 12 जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ मैदानावर उतरणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातून मिळणारा सर्व निधी ख्राईस्टचर्च हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

न्यूझीलंड संघ - टीम साऊदी ( कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलीन डी ग्रँडहोम, लुकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्तील, स्कॉट कुगेललेईंज, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, जिमी नीशॅम, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट, इश सोढी, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर.

इंग्लंड संघ  - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जॉनी बेअरस्टो, टॉम बँटन, सॅम बिलिंग, पॅट ब्राऊन, सॅम कुरन, टॉम कुरन, जो डेन्ली, लुईस ग्रेगरी, ख्रिस जॉर्डन, सकीब महमूद, डेवीड मलान, मॅट पर्किसन, आदील रशीद, जेम्स व्हिंस 

वेळापत्रकट्वेंटी-20 सामने1 नोव्हेंबर, ख्राईस्टचर्च3 नोव्हेंबर - वेलिंग्टन5 नोव्हेंबर - नेल्सन8 नोव्हेंबर - नेपीएर10 नोव्हेंबर - ऑकलंड 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंडदहशतवादी हल्ला