Join us

आणखी एक क्रिकेटर झाला बाबा! विराटनंतर विल्यमसनच्याही घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Kane Williamson: केन विल्यमसनच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:57 IST

Open in App

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन नुकताच तिसऱ्यांदा वडील झाला आहे. केन विल्यमसनची पत्नी सारा रहीम हिने एका मुलीला जन्म दिला आहे. विल्यमसन आणि सारा यांना आधीच आणखी दोन मुले आहेत. एक वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे आणि आता ते तिसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. केन विल्यमसनने २७ फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर एका सुंदर पोस्टद्वारे तिसऱ्यांदा वडील झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

विल्यमसनने नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि तिसऱ्या मुलाच्या आगमनासाठी पत्नीसोबत वेळ घालवला. ३३ वर्षीय फलंदाजाने त्याची पत्नी सारा रहीम आणि नवजात बाळासोबत इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

केन विल्यमसनने कॅप्शनमध्ये लिहिले की, आता आम्ही तिघे झालो आहोत. बेबी गर्ल या जगात तुझे स्वागत आहे. मी तुझा या जगात सुरक्षित आगमनाबद्दल आणि पुढील रोमांचक प्रवासाबद्दल खूप आभारी आहे.

२९ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी केन विल्यमसन संघासोबत जोडला जाऊ शकतो. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान विल्यमसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या कसोटीत दोन शतके झळकावली. विल्यमसनने दुसऱ्या कसोटीत आपल्या १७२व्या डावात शतक झळकावून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३२ शतके झळकावण्याचा मान पटकावला. 

टॅग्स :केन विल्यमसनन्यूझीलंड