वनडे मालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का दिल्यावर न्यूझीलंडचा संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. नागपूरच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याआधी टी-२० संघाचा कर्णधार मिचेल सँटनर याने पत्रकार परिषदेत भारतीय संघाला ट्रम्प कार्डची भीती दाखवत आपल्या संघातील खेळाडूंनाही सावध केल्याचे पाहायला मिळाले. नेमकं तो काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तो वनडेतील फॉर्म टी-२० मध्येही कायम ठेवेल
टी-२० मालिकेआधी मिचेल सँटनरसह स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत ब्रेसवेलच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरलेल्या नवख्या न्यूझीलंड संघाने ३८ वर्षांचा दुष्काळ संपवत भारतीय मैदानात पहिली वहिली वनडे मालिका जिंकली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत डॅरिल मिचेल याने मोठे योगदान दिले. पहिल्या सामन्यातील अर्शशतकानंतर (८४ धावा) उर्वरित दोन सामन्यात त्याने सलग दोन शतके झळकावली. दुसऱ्या सामन्यात नाबाद १३१ धावा करत संघाला मालिकेत बरोबरी करुन देणाऱ्या मिचेलनं तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत १३७ धावांची खेळी मॅच विनिंग खेळी केली होती. हा खेळाडू टी-२० मालिकेतही अशीच धमक दाखवेल, असा विश्वास मिचेल सँटनरनं व्यक्त केला आहे.
IND vs NZ T20I : शंभर टक्के ‘सेंच्युरी’! सूर्या दादा थेट विराट–रोहितच्या खास पंक्तीत सामील होणार
डॅरियल मिचेलवर कौतुकाचा वर्षाव अन्...
टी २० मालिकेतील पहिल्या सामन्या आधी मिचेल सँटनर म्हणाला, "डॅरिल मिचेल हा सुरुवातीला फिरकीसमोर अडखळत खेळायचा. पण कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने आपल्यातील उणीव भरून काढली आहे. सध्याच्या घडीला तो फिरकीपटूंचा उत्तमरित्या सामना करत आहे. वनडेनंतर आता टी २० मध्येही तो कामगिरीतील सातत्य कायम ठेवेल, अशी आशा आहे." न्यूझीलंड कर्णधारानं डॅरिल मिचेलचं कौतुक करताना एका अर्थाने त्याने टीम इंडियाला त्याची भीतीच दाखवली आहे.
अविश्वसनीय यश विसरा आता...
भारतीय मैदानात खेळायला आवडते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने टीम इंडियासारख्या मजबूत प्रतिस्पर्धी संघासोबत द्विपक्षीय मालिके खेळणं महत्त्वाचे ठरेल. भारतीय संघाविरुद्ध कसोटी पाठोपाठ वनडेत अविश्वसनीय यश मिळाले असले तरी टी-२० मध्ये वेगळे आव्हान असेल. या प्रकारात टीम इंडिया सर्वोत्तम आहे. त्यामुळे आधी काय केलं ते विसरुन नव्या ताकदीनं मैदानात उतरण्याची गरज आहे, असेही तो म्हणाला आहे.
Web Summary : New Zealand's Santner, after the ODI win, cautioned his team about India's T20 strength. He praised Daryl Mitchell's improved spin play, hinting at his potential threat, while urging his team to forget past wins and focus on the new challenge.
Web Summary : एकदिवसीय जीत के बाद, न्यूजीलैंड के सैंटनर ने भारत की टी20 ताकत के बारे में अपनी टीम को आगाह किया। उन्होंने डेरिल मिशेल के बेहतर स्पिन खेल की प्रशंसा की, उनकी संभावित खतरे की ओर इशारा किया और अपनी टीम से पिछली जीत को भूलकर नई चुनौती पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया।