Join us

हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा

महेंद्रसिंग धोनीचा नवीन लूक.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 14:16 IST

Open in App

चाहत्यांच्या लाडक्या माहीचा स्वॅग... भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोशल मीडियाच्या या जगात सोशल मीडियापासून दूर असतो. पण, त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधत असते. याशिवाय साक्षीच चाहत्यांना आपल्या लाडक्या माहीची झलक दाखवत असते. आता धोनीचा एक नवीन लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. तरुणाईला लाजवेल असा धोनीचा लूक सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. ४३ वर्षीय धोनीची हेअरस्टाईल नेहमीच चर्चेत असते. लांबलचक केस वाढवून भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या माहीची झलक आजतागायत चाहत्यांच्या मनात ताजी आहे. 

दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्ड