Join us

फायनलच्या सुपर ओव्हरवर आयसीसीचा नवा नियम

आयसीसीने हा नियम यापूर्वीच तयार केला असला तर कदाचित न्यूझीलंडने विश्वचषक जिंकला असता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:41 IST

Open in App

मुंबई : यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी सुपर ओव्हरमुळे चांगलीच चर्चेत आली होती. न्यूझीलंडने या सामन्यात दर्जेदार खेळ केला, पण फक्त एका नियमामुळे न्यूझीलंडला विश्वचषक गमवावा लागला आणि इंग्लंडने जेतेपद पटकावले. आता नियम आयसीसीने बदलला आहे.

यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरही टाय झाली होती. यावेळी चौकार आणि षटकारांच्या जोरावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले होते. या आयसीसीच्या नियमावर चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळेच आता आयसीसीने या नियमामध्ये बदल केला आहे.

आयसीसीचा नवा नियम काय सांगतोजर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.

टॅग्स :आयसीसीन्यूझीलंडइंग्लंड