Join us

LSG च्या गोलंदाजावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई! प्रकरण 'गंभीर'; जाणून घ्या कारण 

लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन उल हक ( Naveen-ul-Haq) याच्यावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:04 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लिलावाची तयारी सुरू असताना लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन उल हक ( Naveen-ul-Haq) याच्यावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यूएईत खेळवण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल लीग ट्वेंटी-२०साठी ( ILT20) ही बंदी घातली गेली आहे. नवीन उल हकने शाहजाह वॉरियर्स ( Sharjah Warriors ) यांच्यासोबतच्या रिटेंशन नोटिसीवर स्वाक्षरी करण्यास त्याने नकार दिल्याने त्याला लीगच्या दुसऱ्या पर्वात खेळता येणार नाही. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ही लीग खेळवण्यात येणार आहे. 

२० महिन्यांच्या बंदीमुळे नवीन उल हकला ILT20च्या २०२४ व २०२५च्या पर्वाला मुकावे लागणार आहे, परंतु त्याला आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीच्या मालकी हक्क असलेल्या डर्बन सुपर जायंट्सने करारबद्ध केले आहे. हा संघ दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमधील हा संघ आहे. वॉरियर्सने २०२३ मध्ये नवीनला करारबद्ध केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी नवीनला रिटेंशन नोटीस पाठवली होती, परंतु नवीनने त्याला उत्तर दिले नाही. शाहजाह वॉरियर्सने या संदर्भात ILT20ला मध्यस्थी करण्यास सांगतली आणि त्यासाठी थर्ड पार्टी मध्यस्थी नेमला, परंतु तेही प्रयत्न अपयशी ठरले.  

ILT20 चे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट, शिस्तपालन समितीने अँटी करप्शन  कोल अॅझम व ECBचे सदस्य झायेज अब्बास यांचा समावेश असलेल्या समितीने वॉरियर्स व नवीन यांची दोघांची बाजू ऐकली आणि त्यानंतर हा निर्णय दिला. ''आम्हाला हा निर्णय सांगताना अभिमान वाटत नाही, परंतु खेळाडूंनी करारबद्ध असलेल्या फ्रँचायझींच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दुर्दैवाने नवीनने त्याने तसे केले नाही आणि त्यामुळे त्याच्यावर २० महिन्यांच्या बंदीची कारवाई करावी लागली,'' असे व्हाईट यांनी सांगितले.  नवीनने २०२३ च्या पर्वात ११ विकेट्स घेतल्या होत्या आणि ती लीगमधील जुनैद सिद्धीकी याच्यासह सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. वॉरियर्सला त्या पर्वात १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवता आले होते.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटलखनौ सुपर जायंट्स