Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: हर्षित राणाच्या जागी KKR नं 'या' खेळाडूला दिली संधी! गिलच्या GT च्या ताफ्यातही आला नवा गडी

IPLच्या यंदाच्या हंगामात कोणत्या संघाने कुणाच्या जागी कुणाला दिली संधी? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 20:50 IST

Open in App

Navdeep Saini Replaces Harshit Rana In KKR IPL 2026 Full List Of Players Ruled Out And Their Replacements : इंडियन प्रीमियर लीगचा १९ व्या हंगाम लवकरच सुरू होणार असून, संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे अनेक फ्रँचायझींंना धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने २५ मार्चला हर्षित राणाच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली. अष्टपैलू खेळाडूच्या जागी शाहरुखच्या सह मालकीच्या संघाने भारताच्या नवदीप सैनीला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील  गुजरात टायन्सच्या संघाने कुलवंत खेजरोलिया याला पृथ्वी राज याराच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात संघात घेतले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोलकाताला सर्वाधिक फटका, याशिवाय या संघावर आली बदली खेळाडू निवडण्याची वेळ

कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामाआधी सर्वाधिक फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आकाश दीप, मुस्तफिजुर रहमान आणि हर्षित राणा या तिघांच्या जागी संघाला बदली खेळाडूचा संघात समावेश करण्याची वेळ आली.  चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनाही त्यांच्या मुख्य संघातील प्रमुख खेळाडूंची उणीव भासण्याची शक्यता आहे.

IPL फ्रँचायझी संघ RR चा विक्रमी सौदा! शेन वॉर्नच्या ‘त्या’ मास्टर डीलमुळे कुटुंबाला ४६० कोटींचा फायदा 

या परदेशी खेळाडूंनी PSL ला ठेंगा दाखवत IPL ला दिली पसंती

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने कॉर्बिन बॉशची निवड केल्यानंतर, अनेक संघांनी अशा बदली खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांचे यापूर्वी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी करार होते. यात स्पेन्सर जॉन्सन, ब्लेसिंग मुझारबानी आणि दसुन शनाका या परदेशी खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीग सोडून आयपीएलला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. 

कोणत्या IPL फ्रँचायझी संघाने कुणाच्या जागी कोणत्या खेळाडूला दिली संधी; इथं पाहा संपूर्ण यादी  

  • मुस्ताफिजूर रहमान (कोलकाता नाईट रायडर्स) – BCCI च्या विनंतीमुळे बाहेर; बदली: ब्लेसिंग मुजरबानी.
  • अथर्व अंकोलेकर (मुंबई इंडियन्स) – गुडघ्याची दुखापत; बदली नाही.
  • हर्षित राणा (कोलकाता नाईट रायडर्स) – गुडघ्याची दुखापत; बदली: नवदीप सैनी.
  • नॅथन एलिस (चेन्नई सुपर किंग्स) – हॅमस्ट्रिंग दुखापत; बदली: स्पेन्सर जॉन्सन.
  • सॅम करन (राजस्थान रॉयल्स) – ग्रोइन दुखापत; बदली: दासुन शनाका.
  • जॅक एडवर्ड्स (सनरायझर्स हैदराबाद) – पायाची दुखापत; बदली: डेव्हिड पेन.
  • पृथ्वीराज यारा (गुजरात टायटन्स) – कारण स्पष्ट नाही; बदली: कुलवंत खेझरोलिया.
  • आकाश दीप (कोलकाता नाईट रायडर्स) – पाठ दुखापत; बदली: सौरभ दुबे.
  • बेन डकेट (दिल्ली कॅपिटल्स) – वैयक्तिक कारणामुळे माघार; बदली नाही.
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: KKR replaces Rana, GT gets new player due injury.

Web Summary : Injuries force IPL teams to shuffle squads. KKR replaces injured Harshit Rana with Navdeep Saini. GT signs Kulwant Khejroliya, replacing Prithviraj Yarra. Several other teams make changes due to injuries and personal reasons.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीगगुजरात टायटन्सहर्षित राणाचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स