Join us

PAK vs ENG: पाकिस्तानच्या संघाला मोठा झटका! मेन गोलंदालाच करावं लागलं रूग्णालयात भर्ती

सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 16:15 IST

Open in App

कराची : पाकिस्तानी संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला व्हायरल संक्रमणामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तो बुधवारी लाहोरमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकणार नाही. पाचव्या टी-20 सामन्यासाठी नसीम शाहचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान जवळपास निश्चित झाले होते. परंतु मंगळवारी रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यामुळे युवा गोलंदाजाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

माहितीनुसार, आता त्याची प्रकृती ठीक आहे मात्र सात सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये नसीम खेळणार का याबाबत संभ्रम आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एका निवेदनात म्हटले आहे की, "व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु आता त्याला बरे वाटत आहे."

पीसीबीने दिली माहितीपीसीबीने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, "नसीम आज रात्री होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही. तसेच उर्वरित सामने खेळणार का याबाबतचा निर्णय वैद्यकीय समितीच्या सल्ल्याने घेतला जाईल." पीसीबीच्या जवळच्या सूत्रांनी म्हटले की, त्याची डेंग्यूची चाचणीही करण्यात आली असून अद्याप त्याचा रिपोर्ट समोर आला नाही. मागील महिनाभरापासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दररोज हजारो लोक बळी पडत आहेत.

दुखापतीने वाढवली पाकिस्तानची डोकेदुखी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सात सामन्यांची टी-20 मालिका पाकिस्तानच्या धरतीवर खेळवली जात आहे. नसीम शाह मालिकेतील सुरूवातीच्या सामन्यात खेळला होता. मात्र यानंतर तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला होता. 21 वर्षीय नसीम टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघाचा हिस्सा आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सध्याच्या घडीला 2-2 अशा बरोबरीत आहे. खरं तर नसीम शाह शाहिन आफ्रिदीच्या जागी पाकिस्तानी संघात खेळत आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शाहिन जुलैच्या मध्यापासून संघाबाहेर आहे. शाहिन आणि नसीम या दोघांचाही पाकिस्तानच्या टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडटी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2हॉस्पिटल
Open in App