Join us

६० वर्षांनी काढली नरी काँट्रॅक्टरांच्या डोक्यातील प्लेट, १९६२च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात डोक्याला लागला होता चेंडू

Nari contractor News: भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 08:18 IST

Open in App

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांच्या डोक्यामध्ये धातूची प्लेट टाकण्यात आली होती. ही प्लेट गुरुवारी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. क्रिकेट विश्लेषक मकरंद वायंगणकर यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.भारतीय क्रिकेट संघाच्या १९६२ सालच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात वेगवान गोलंदाज चार्ली ग्रिफिथ यांचा भेदक बाऊन्सर काँट्रॅक्टर यांच्या डोक्यावर आदळला होता. यामुळे ते खेळपट्टीवरच कोसळले होते. त्यानंतर काँट्रॅक्टर यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. काँट्रॅक्टर सध्या ८८ वर्षांचे असून आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांचा मुलगा होशेदर काँट्रॅक्टर यांनी सांगितले.

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटभारतीय क्रिकेट संघमुंबई
Open in App