Join us

Narendra Modi Stadium: 'नरेंद्र मोदी स्टेडियम'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद; जय शाह यांनी स्वीकारले मानचिन्ह

'नरेंद्र मोदी स्टेडियम'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 17:27 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-२० सामन्यात सर्वाधिक प्रेक्षक उपस्थितीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. याबाबत बीसीसीयने ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली. खरं तर आयपीएल २०२२चा अंतिम सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. याच सामन्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. 

दरम्यान, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात २९ मे २०२२ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ फायनलच्या सामन्याला तब्बल १०१,५६६ लोकांनी हजेरी लावली आणि एक नवीन विश्वविक्रम नोंदवला. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्वांचे आभार मानताना म्हटले, "२९ मे २०२२ रोजी @GCAMotera च्या भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर १०१,५६६ लोकांनी @IPLचा फायनलचा सामना पाहिला. टी-२० सामन्यात सर्वात जास्त उपस्थितीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला आणि अभिमान वाटला. आमच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार. @BCCI." 

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या मोहिमेत राजस्थान रॉयल्सविरूद्ध सात गडी राखून विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघाने आपल्या पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफीवर कब्जा केला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :बीसीसीआयगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनरेंद्र मोदी स्टेडियमजय शाहआयपीएल २०२२
Open in App