आयपीएलच्या १८ वा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि १८ नंबर जर्सीत मिरवणाऱ्या विराट कोहलीसाठी खास ठरला. पंजाब किंग्जला रोखून आरसीबीच्या संघाने पहिल्यांदा ट्रॉफी उंचावली. जेतेपदकासह IPL मधील नवा चॅम्पियन संघ बंगळुरुला पोहचला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर चॅम्पियन्स खेळाडूंच्या सन्मानासाठी खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुष्काने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी
चॅम्पियन खेळाडूंची बस स्टेडियमकडे जात असताना RCB च्या चॅम्पियन खेळाडूंची झलक पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. खेळाडूंसाठी आयोजित खास कार्यक्रमासाठी अनुष्का शर्माहीविराट कोहलीच्या बसमधूनच स्टेडियमवर पोहचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान अनुष्काने चॅम्पियन्स स्वागतासाठी बंगळुरुच्या चाहत्यांनी दाखवलेल्या उत्सकतेची खास झलक शेअर केली आहे.
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
अनुष्कानं शेअर केलेला हा व्हिडिओ होतोय व्हायरल
विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री
अनुष्का शर्मा हिने नम्मा बंगळुरु या खास कॅप्शनसह शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमधील व्हिडिओमध्ये अनुष्का विराट कोहली आणि RCB च्या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बसमध्ये बसल्याचे दिसून येते. आयपीएल ट्रॉफीची झलक अन् चॅम्पियन्सला पाहण्याची चाहत्यांमधील उत्सुकता ती आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करताना दिसून आले.