हितेन नाईक -पालघर : टीम इंडियाच्या ऑस्टेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात पालघर जिल्ह्याच्या शार्दुल ठाकूरने अष्टपैलू कामगिरी करून आपले मोलाचे योगदान दिले. शार्दूलच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.भारतीय संघाचे स्वप्न पाहणारा शार्दूल पहाटे ४ वाजता पालघरच्या माहीम गावातून मुंबई असा दररोज रेल्वे प्रवास करायचा. शार्दूलच्या आजच्या अष्टपैलू कामगिरीने आजवर त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्याचे वडील निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केली. शार्दूलचे आठवीपर्यंतचे शिक्षण पालघरच्या आनंदाश्रम कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे नववीसाठी बोईसर येथील तारापूर विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दहावीचे शिक्षण त्याने बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुलमधून पूर्ण केले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण खालसा कॉलेज आणि पदवीपर्यंतचे शिक्षण रिझवी कॉलेजमधून पूर्ण केले. शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने एका षटकात सलग सहा षट्कार मारून लक्ष वेधून घेतले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- शार्दूलने उंचावले पालघरचे नाव, भारताच्या विजयात अष्टपैलू कामगिरी
शार्दूलने उंचावले पालघरचे नाव, भारताच्या विजयात अष्टपैलू कामगिरी
भारतीय संघाचे स्वप्न पाहणारा शार्दूल पहाटे ४ वाजता पालघरच्या माहीम गावातून मुंबई असा दररोज रेल्वे प्रवास करायचा. शार्दूलच्या आजच्या अष्टपैलू कामगिरीने आजवर त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्याचे वडील निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:10 IST