ICC T20 World Cup 2026, Bas de Leede shines as Netherlands beat Namibia : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील १० वा सामना खेळवण्यात आला. नेदरलँड्सच्या संघाने आणि नामिबियाला एकहाती पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह डच संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला खास रेकॉर्डही भक्कम केला आहे. दुसरीकडे नामिबीयाला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. नामिबियासाठी भारतीय मैदानातील हा पहिला आंतरारष्ट्रीय सामना होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नामिबियाच्या संघाने निर्धारित षटकात केल्या होत्या १५६ धावा
नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. नामिबियाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १० धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. परिणामी निर्धारित २० षटकात नामिबियाच्या संघाने ८ विकेट्सच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या. जान निकोल लॉफ्टी-ईटन याने ३८ चेंडूत ४२ धावा तर जान फ्रायलिंकने २६ चेंडूत केलेल्या ३० धावा वगळता अन्य कुणालाही फारशी चमक दाखवता आली नाही. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीक आणि बॅस डे लीडे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या, तर आर्यन दत्त आणि फ्रेड क्लासेन यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
ICC चा ‘तो’ मास्टरस्ट्रोक आणि पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास झाला तयार, नेमकं काय घडलं?
धावांचापाठलाग करताना डे लीडे–एडवर्ड्सची निर्णायक भागीदारी
नामिबियाने दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाची सुरुवातही अडखळतच झाली. पण तिसऱ्या विकेटसाठी बॅस डे लीडे आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यांनी ७० धावांची दमदार भागीदारी करत संघाला सामन्यात आणले. बॅस डे लीडे याने ४८ चेंडूत ७२ धावांची खेळी करत संगाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय कॉलिन एकरमन याने ३२ धावा तर तर मायकेल लेव्हिट याने २८ धावांचे योगदान दिले. नेदरलँड्सचा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा ११ वा विजय ठरला. एसोसिएट्स देशांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम त्यांनी आणखी भक्कम केला आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी एसोसिएट संघ आहे नेदरलँड्स,
- ११ – नेदरलँड्स
- ८ – स्कॉटलंड
- ५ – अफगाणिस्तान
- ५ – नामीबिया
- ३ – आयर्लंड
Web Summary : Bas de Leede's all-round performance propelled the Netherlands to a T20 World Cup victory over Namibia in Delhi. Winning the toss, Netherlands restricted Namibia to 156. De Leede's 72 and Edwards' support secured the win, strengthening Netherlands' record in the tournament.
Web Summary : बास डी लीडे के ऑलराउंड प्रदर्शन से नीदरलैंड्स ने टी20 विश्व कप में नामीबिया पर जीत हासिल की। नीदरलैंड्स ने नामीबिया को 156 पर रोका। डी लीडे के 72 रन और एडवर्ड्स के समर्थन से नीदरलैंड्स ने जीत दर्ज की, और टूर्नामेंट में अपना रिकॉर्ड मजबूत किया।