आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव अबू धाबी येथे पार पडला. या लिलावात एका बाजूला अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. दुसरीकडे काही स्टार क्रिकेटर्सला अनसोल्डचा टॅग लागला. लिलावात भाव न मिळालेल्या क्रिकेटरमध्ये MI चा 'जितेंद्र भाटवडेकर' अर्थात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोचाही समावेश होता. गत हंगामात बदली खेळाडूच्या रुपात मुंबई इंडियन्सने पार्ट टाइम जॉबसाठी त्याच्यावर ५.२५ कोटी रुपये खर्च केले होते. पण लिलावात MI नं त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या इतकीच बेस प्राइज असलेल्या क्विंटन डी कॉकवर MI नं पहिली बोली लावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI मध्ये जपली जाते आपल्या ताफ्यातील जुन्या खेळाडूला पहिली पसंती देण्याची परंपरा, पण..
मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या ताफ्यातील जुन्या खेळाडूंना पहिली पसंती देणारा संघ आहे. यंदाच्या लिावात क्विंटन डी कॉकवर लावलेली बोली असो वा पर्समध्ये पैसा नसताना कॅमरुन ग्रीनवर २ कोटीसह खेळलेली पहिली चाल या गोष्टीतून MI चा जुन्या खेळाडूंबद्दल असणारी एक आत्मियतेसंदर्भात खास दर्शन पाहायला मिळाले. पण जॉनी बेअरस्टो मात्र दुर्लक्षितच राहिला. मुंबई इंडियन्सला कॅमरून ग्रीनला आपण आयपीएलमध्ये आणलं ते आठवलं, पण बदली खेळाडूच्या रुपात येऊन MI साठी दणक्यात सुरुवात करुन देणाऱ्या इंग्लंडच्या स्टार क्रिकेटरसाठी MI नं लिलावात "जॉनी जॉनी नो ...बोली" असा काहीसा पवित्रा घेतला.
'अनसोल्ड' राहिलेल्या जॉनीनं सोशल मीडियावरील पोस्टवरून व्यक्त केल्या भावना
IPL २०२६ च्या मिनी लिलावात अनसोल्ड राहिल्यावर जॉनी बेअरस्टोनं सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. रोहित शर्मासोबत MI च्या डावाची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेला फोटो शेअर करताना त्याने लिहिलंय की, "मुंबई इंडियन्ससोबतचा माझा प्रवास छोटा, पण गोड आठणीची अनुभूती देणारा होता. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद." एका ओळीत व्यक्त केलेल्या पोस्टमध्ये क्रिकेटरच्या मनात MI चा संघ भाव देईल, अशी अपेक्षा दडलेली दिसते. आभार व्यक्त करत त्याने मनाला लागलेली गोष्टही बोलून दाखवल्याचे दिसून येते.