Join us

पाकसाठी मुनिबा अलीचे पहिले टी-२० शतक, ६७ चेंडूत १०० धावा

प्रत्युत्तरात आयर्लंड संघ १६.३ षटकांत ९५ धावांमध्ये गारद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 05:44 IST

Open in App

केपटाऊन : महिला टी-२० विश्वचषकात बुधवारी रात्री यंदा पहिल्या शतकाची नोंद झाली. पाकिस्तानची सलामीची फलंदाज मुनिबा अलीने ६८ चेंडूंत १०२ धावा ठोकल्या. २५ वर्षांची मुनिबा सामन्याची मानकरी ठरली. तिच्या खेळीमुळे पाकने २० षटकांत ५ बाद १६५ अशी मजल मारली.

प्रत्युत्तरात आयर्लंड संघ १६.३ षटकांत ९५ धावांमध्ये गारद झाला. हा सामना पाकने ७० धावांनी जिंकला. पाकच्या वरिष्ठ संघाकडून विश्वचषकात हे पहिलेच शतक होते. तिच्याआधी निदा दार हिने २०१९ साली पाकच्या महिला खेळाडूकडून सर्वाधिक ७५ धावांची पहिली खेळी केली होती.

टॅग्स :पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेट
Open in App