Join us

कोरोना संकटामुळे मुंबई टी-२० लीग स्थगित, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुंबई टी-२० लीग स्पर्धा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 13:28 IST

Open in App

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुंबई टी-२० लीग स्पर्धा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० लीगशी संबंधीत सर्व खेळाडू, व्यवस्थापक, संघ आणि सपोर्ट स्टाफच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पत्रक मुंबई क्रिकेट असोसिएशननं जारी केलं आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने २०१८ सालापासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. यंदाचं या लीगचं तिसरं वर्ष आहे. पहिल्या मोसमात लीगला चांगला प्रतिसाद लाभला होता. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता.  

टॅग्स :मुंबईटी-20 क्रिकेट