IPL 2021, MI vs SRH, Live: इशान, सूर्यकुमारची बातच न्यारी! बघत राहिली दुनिया सारी, MIनं उभारली आजवरची सर्वोच्च धावसंख्या

IPL 2021, MI vs SRH, Live: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी करत खराब कामगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकांना खणखणीत प्रत्त्युतर दिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:41 PM2021-10-08T21:41:11+5:302021-10-08T21:42:06+5:30

whatsapp join usJoin us
mumbai indians posted 235 for 9 from 20 overs highest score ever for MI in their history | IPL 2021, MI vs SRH, Live: इशान, सूर्यकुमारची बातच न्यारी! बघत राहिली दुनिया सारी, MIनं उभारली आजवरची सर्वोच्च धावसंख्या

IPL 2021, MI vs SRH, Live: इशान, सूर्यकुमारची बातच न्यारी! बघत राहिली दुनिया सारी, MIनं उभारली आजवरची सर्वोच्च धावसंख्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज अबूधाबीत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी करत खराब कामगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकांना खणखणीत प्रत्त्युतर दिलं आहे. मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबासमोर विजयासाठी २३६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईसाठी आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफचं तिकीट पक्क करण्यासाठी आज सनरायझर्स विरुद्ध १७० धावांपेक्षा अधिक फरकानं विजय प्राप्त करावा लागणार आहे. आव्हान खडतर असलं तरी मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करुन घेतला आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्यात दोनशे धावसंख्येचा आकडा कोणत्याचं संघाला गाठता येत नव्हता. त्यात अबूधाबीत मुंबईची कामगिरी देखील जेमतेम झाली होती. त्याच स्टेडियमवर मुंबईच्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी जबरदस्त फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली आहे. 

मुंबई इंडियन्सनं आज गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असलो तरी आम्ही पाचवेळा चॅम्पियन आहोत याची प्रचिती करुन दिली आहे. मुंबईच्या आजच्या फलंदाजीनं हैदराबादपेक्षा खरंतर कोलकाता नाइट रायडर्स संघातील खेळाडू जास्त चिंताग्रस्त झाले असतील. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

सामन्याची नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवातच दमदार झाली. इशान किशननं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत मनसुबा स्पष्ट केला होता. गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. रोहित शर्मा १८ धावांवर बाद झाला. पण त्याचा दबाव निर्माण न होऊ देता इशाननं फटकेबाजी सुरूच ठेवली. इशान किशननं अवघ्या ३२ चेंडूत ४ खणखणीत षटकार आणि ११ चौकारांच्या साथीनं ८४ धावांची खेळी साकारली. तर हार्दिक पंड्या (१०), कायरन पोलार्ड (१३), जिमी निशम (०) स्वस्तात बाद झाले असताना सूर्यकुमार यादवनं सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत मैदानात जम बसवत संघाला २०० धावांचा आकडा पार करुन दिला. सूर्यकुमारनं ४० चेंडूत ३ षटकार आणि १३ चौकार ठोकत नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. कृणाल पंड्या (९), कुल्टर नाइल (३), पियूष चावला (०) स्वस्तात बाद झाले. हैदराबादकडून जेसन होल्डरनं ४ विकेट्स घेतल्या. तर राशीद खान, अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उमरान मलिकनं इशान किशनची महत्त्वाची विकेट घेतली.

Web Title: mumbai indians posted 235 for 9 from 20 overs highest score ever for MI in their history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.