Join us

मुंबई इंडियन्सचा शिलेदार झाला बाबा; मुलीचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी!

मुंबई इंडियन्सनं केलं अभिनंदन..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:49 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज मिचेल मॅक्लेघन ( Mitchell McClenaghan ) याच्या घरी नन्ही परी आली आहे. मिचेल व त्याची पत्नी जॉर्जिया यांना कन्याप्राप्ती झाली आहे. कोब हार्पर मॅक्लेघन असे त्यांनी या मुलीचे नाव ठेवले आहे. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावरून मिचेल व जॉर्जिय यांचे अभिनंदन केले आहे. 

न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल यानं २०१५ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण केलं. मुंबई इंडियन्ससाठी त्यानं त्या पर्वात १० सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०१६ आणि २०१७ मध्ये त्यानं मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. २०१८च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला, परंतु जेसन बेहरेनडॉर्फ याला रिप्लेसमेंट म्हणून मिचेलचीच मुंबई इंडियन्सनं निवड केली.  मिचेलनं न्यूझीलंडसाठी ४८ वन डेत ८२ विकेट्स, २९ ट्वेंटी-२०त ३० विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सन्यूझीलंड
Open in App