Akash Ambani IPL 2022 : Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल 

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सनला आयपीएल २०२२ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 03:23 PM2022-04-07T15:23:58+5:302022-04-07T15:24:20+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians owner Akash Ambani reaction viral after Kolkata Knight Riders beat MI in thrilling match of IPL 2022  | Akash Ambani IPL 2022 : Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल 

Akash Ambani IPL 2022 : Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सनलाआयपीएल २०२२ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक लढतीत ५ विकेट्स व २४ चेंडू राखून हा विजय मिळवला. पॅट कमिन्सने ( Pat Cummins) १५ चेंडूंत नाबाद ५६ धावांची खेळी करून सामना फिरवला. कोलकाताची अवस्था ५ बाद १०१ अशी असताना Mumbai Indians चे मालक आकाश अंबानी ( Akash Ambani) व त्यांची पत्नी श्लोका मेहता अंबानी ( Shloka Mehta Ambani) हे खूप आनंदात होते. पण, पॅट कमिन्स आला अन् ३० चेंडूंत करायच्या ३५ धावा त्याने ६ चेंडूंतच केल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा पसरला. आकाश अंबानींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.  

मुंबईला तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ४९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी करून सावरले. पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले.  सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला.  किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला.   

प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यरने सावध सुरुवात केली. पण, कोलकाताचा निम्मा संघ १०१ धावांवर तंबूत परतला होता. अजिंक्य ( ७), श्रेयस अय्यर ( १०), सॅम बिलिंग्स ( १७), आंद्रे रसेल ( ११) व नितिश राणा ( ८) हे माघारी परतले. मात्र, १६व्या षटकात कमिन्सने कहरच केला. टायमल मिल्सच्या त्या षटकात त्याने ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६ खेचून कोलकाताला विजय मिळवून दिला. कमिन्स १५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ५६ धावांवर नाबाद राहिला. वेंकटेश ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५० धावांवर नाबाद राहिला. KKR ने १६ चेंडूंत ५ बाद १६२ धावा करून सामना जिंकला. 


Web Title: Mumbai Indians owner Akash Ambani reaction viral after Kolkata Knight Riders beat MI in thrilling match of IPL 2022 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.