Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सनलाआयपीएल २०२२ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक लढतीत ५ विकेट्स व २४ चेंडू राखून हा विजय मिळवला. पॅट कमिन्सने ( Pat Cummins) १५ चेंडूंत नाबाद ५६ धावांची खेळी करून सामना फिरवला. कोलकाताची अवस्था ५ बाद १०१ अशी असताना Mumbai Indians चे मालक आकाश अंबानी ( Akash Ambani) व त्यांची पत्नी श्लोका मेहता अंबानी ( Shloka Mehta Ambani) हे खूप आनंदात होते. पण, पॅट कमिन्स आला अन् ३० चेंडूंत करायच्या ३५ धावा त्याने ६ चेंडूंतच केल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा पसरला. आकाश अंबानींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
![]()
मुंबईला तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ४९ चेंडूंत ८३ धावांची भागीदारी करून सावरले. पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यरने सावध सुरुवात केली. पण, कोलकाताचा निम्मा संघ १०१ धावांवर तंबूत परतला होता. अजिंक्य ( ७), श्रेयस अय्यर ( १०), सॅम बिलिंग्स ( १७), आंद्रे रसेल ( ११) व नितिश राणा ( ८) हे माघारी परतले. मात्र, १६व्या षटकात कमिन्सने कहरच केला. टायमल मिल्सच्या त्या षटकात त्याने ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६ खेचून कोलकाताला विजय मिळवून दिला. कमिन्स १५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ५६ धावांवर नाबाद राहिला. वेंकटेश ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५० धावांवर नाबाद राहिला. KKR ने १६ चेंडूंत ५ बाद १६२ धावा करून सामना जिंकला.
Web Title: Mumbai Indians owner Akash Ambani reaction viral after Kolkata Knight Riders beat MI in thrilling match of IPL 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.