Join us

Kieron Pollard Mumbai Indians Video, IPL 2022  MI vs KKR: दैव देतं नि कर्म नेतं.... आळशी पोलार्डच्या बाबतीत नक्की काय घडलं पाहा!

मुंबईचा कोलकाताने ५२ धावांनी केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 00:32 IST

Open in App

Kieron Pollard Video, IPL 2022 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या संघाला दोन विजयानंतर पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागले. १६६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण डाव अवघ्या ११३ धावांमध्ये आटोपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने पाच बळी घेत दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि इतर गोलंदाजांनी अचूक मारा करत कोलकाताला विजय मिळवून दिला. सामन्यात किरॉन पोलार्डच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली.

सामना हळूहळू कोलकाताच्या पारड्यात जात असताना मुंबई इंडियन्सलाकिरॉन पोलार्डकडून फटकेबाजी पाहण्याची अपेक्षा होती. चाहत्यांनाही पोलार्डची फटकेबाजी फार दिवस पाहता आलेली नसल्याने सारेच त्याकडे डोळे लावून बसले होते. पोलार्ड हा एकेरी दुहेरी धाव घेण्यात फारसा चपळ नसल्याने त्याचा कल मोठ्या फटक्यांकडेच असतो. पण त्याचा हाच आळशीपणा त्याला भोवला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर पोलार्डने हवेत उंच फटका मारला. पण दैव बलवत्तर म्हणून फिल्डरने त्याचा कॅच सोडला. पण पोलार्ड अतिशय आळशीपणाने धाव घेत राहिल्यामुळे तो किपरच्या दिशेला रन आऊट झाला.

आळशी पोलार्डच्या बाबतीत नक्की काय घडलं? पाहा Video

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या डावात कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा या दोघांनी प्रत्येकी ४३ धावा केल्या. त्यासोबत काही छोटेखानी भागीदारींमुळे त्यांची धावसंख्या १६५ वर पोहोचली. जसप्रीत बुमराहने IPL कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ बळी टिपले. प्रत्युत्तरात इशान किशनने ५१ धावांची झुंजार खेळी केली. पण इतर कोणीही चांगली साथ न दिल्याने मुंबईचा डाव ११३ धावांमध्ये आटोपला.

टॅग्स :आयपीएल २०२२किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्सरोहित शर्मा
Open in App