Join us

मुंबई इंडियन्सचा कुंग फु पांड्या पुनरागमनासाठी तयार

मुंबईने शेअर केला व्हिडियो, नव्या भुमिकेबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:53 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात उद्या होणाºया सामन्यातून आयपीएलच्या यंदाच्या सत्राला सुरूवात होणार आहे.त्यात मुंबईचा स्टार फिनीशर हार्दिक पांड्या या सलामीच्या सत्रातील सामन्यातून जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन करणार आहे.  मुंबई इंडियन्सनेटिष्ट्वटरवर त्याचा सराव करतानाचा एक व्हिडियो देखील शेअर केला आहे.

त्याला कुंग फु पांड्या असा हॅश टॅग देखील दिला आहे. हार्दिकने शेवटचा सामना २२ सप्टेंबर २०१९ ला खेळला होता. बंगळुरू हा टी २० सामना दक्षीण आफ्रिकेविरोधात झाला होता. त्यानंतर हार्दिकला दुखापत झाली  होती. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर कोरोनामुळे सर्वच खेळांना मोठा ब्रेक मिळालाहोता. आता हार्दिक पुन्हा सज्ज झाला आहे.

हार्दिक पांड्या हा आमचा चांगला फिनीशर असला तरी त्याची भुमिका बदलली जाऊ शकते. आम्ही आता आणखी नवे फिनीशर तयार करत असल्याचे वक्तव्य मुंबई इंडियन्सचे महेला जयवर्धने यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे त्याच्या नव्या भुमिकेबाबत उत्सुकता आहे. अष्टपैलु हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांनी गेल्या काही सत्रांमध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे. 

हार्दिकची आयपीएलमधील कामगिरीसामने ६६फलंदाजी - धावा १०६८सर्वोच्च धावसंख्या ९१अर्धशतके ३गोलंदाजी - बळी ४२सर्वोत्तम कामगिरी ३/२० 

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएलहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स