Join us

मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 18:23 IST

Open in App

IPL 2024, MI vs KKR : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज कोलकाताच्या इडन गार्डनवर होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी KKR ला फक्त १ विजय हवा आहे, तेच MI आधीच स्पर्धेतून बाद झाले आहेत. मात्र, मुंबईने मागील सामन्यात विजय मिळवल्याने इडन गार्डनवर कोलकाताला ते कडवी टक्कर देतील अशी अपेक्षा आहे. पण, हा सामनाच होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

कोलकाताने ११ सामन्यांत ८ विजय मिळवले आहेत आणि १६ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. प्ले ऑफसाठी त्याना उर्वरित ३ सामन्यांत १ विजय पुरेस आहे, परंतु त्यांचे लक्ष हे क्वालिफायर १ कडे आहे. त्यामुळे ते तिन्ही सामने जिंकून टेबल टॉपर राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तेच मुंबईला १२ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवता आले आहेत आणि त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून शेवटचे स्थान टाळायचे आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण, सध्या कोलकातात तुफान पाऊस सुरू आहे आणि इडन गार्डनचे संपूर्ण मैदान झाकण्यात आले आहे. त्यामुळे हा सामना होण्याची शक्यता कमी आहे.  सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. त्यानंतर कोलकाताचा प्ले ऑफचा प्रवेश पक्का होईल, परंतु क्वालिफायर १ साठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. २०२३ आणि २०२४ या कालावधीत मुंबई इंडियन्सला प्रतिस्पर्धीच्या मैदानांवर १३ पैकी ९ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सुनील नरीनने २५ सामन्यांत १० वेळा बाद केले आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्स