मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाची एंट्री  

स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:42 IST2019-03-28T13:41:27+5:302019-03-28T13:42:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mumbai Indians have signed West Indies pacer Alzarri Joseph | मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाची एंट्री  

मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाची एंट्री  

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकीकडे स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज अॅडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीदरम्यान मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमार याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे बुमराला काही सामने मुकावे लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईचा अन्य एक वेगवान गोलंदाज अॅडम मिलने हासुद्धा जखमी झाल्यामुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबईच्या संघात समावेश करण्याता आला आहे. 





 गेल्या महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जोसेफने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. दरम्यान, जोसेफच्या समावेशामुळे मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची धार वाढणार आहे.  

Web Title: Mumbai Indians have signed West Indies pacer Alzarri Joseph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.