Join us

"कोण आला रे?", चेन्नईविरूद्धच्या सामन्याधी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'मास्टरमाईंड' सामील

IPL 2023, rohit sharma : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 14:33 IST

Open in App

mi vs csk 2023, sachin tendulkar । मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात देखील मुंबई इंडियन्सला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयी सलामी देत मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. मुंबईचा या हंगामातील दुसरा सामना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जसोबत (MI vs CSK) ८ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. खरं तर ८ तारखेला या हंगामातील पहिलाच सामना मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे, त्यामुळे रोहितसेना पुनरागमन करणार का हे पाहण्याजोगे असेल. 

दरम्यान, चेन्नईविरूद्धच्या लढतीपूर्वी मुंबईच्या संघाने आयकॉन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक झलक शेअर केली आहे. तसेच पलटण कोण आला आहे सांगा? असा प्रश्न चाहत्यांना विचारण्यात आला आहे. 

चालू हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल. 

IPL २०२३ साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक - 

  1. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  2. ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
  3. ११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  4. १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून 
  5. १८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  6. २२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  7. २५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  8. ३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  9. ३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  10. ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून 
  11. ९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  12. १२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  13. १६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  14. २१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी  ३.३० वा.पासून  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :मुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकरआयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा
Open in App