IPL 2019 : पोलार्डची फटकेबाजी, मुंबईचे हैदराबादपुढे 137 धावांचे आव्हान

पोलार्डने अखेरच्या षटकांमध्य जोरदार फटकेबाजी केल्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 21:41 IST2019-04-06T21:39:01+5:302019-04-06T21:41:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mumbai Indians given 137uns target to Sunrisers Hyderabad | IPL 2019 : पोलार्डची फटकेबाजी, मुंबईचे हैदराबादपुढे 137 धावांचे आव्हान

IPL 2019 : पोलार्डची फटकेबाजी, मुंबईचे हैदराबादपुढे 137 धावांचे आव्हान

आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबादच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. किरॉन पोलार्डने अखेरच्या षटकांमध्य जोरदार फटकेबाजी केल्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजी केली. पोलार्डने 26 चेंडूंत नाबाद 46 धावा केल्या, त्यामुळे मुंबईला 136 धावा करता आल्या.

हैदराबादने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा हा निर्णय योग्य असल्याचे हैदराबादच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. मुंबईला सातत्याने धक्के देत हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला शून्यावर असताना जीवदान मिळाले होते. पण रोहितलाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितला 11 धावांवर समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही.

Web Title: Mumbai Indians given 137uns target to Sunrisers Hyderabad