Join us

'मेकिंग ऑफ IPL किंग्ज'; मुंबई इंडियन्सवर तयार होतेय डॉक्युमेंटरी

जिथे क्रिकेट तिथे बॉलिवूड आणि जिथे बॉलिवूड तिथे क्रिकेट... हे समीकरण गेली अनेक वर्ष दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:27 IST

Open in App

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट हे न तुटणारे कनेक्शन आहे. जिथे क्रिकेट तिथे बॉलिवूड आणि जिथे बॉलिवूड तिथे क्रिकेट... हे समीकरण गेली अनेक वर्ष दिसत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमुळे (आयपीएल) हे नातं आणखी घट्ट झाले आहे. त्यामुळेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मुंबई इंडियन्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे. नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्ये ‘Cricket Fever: Mumbai Indians’ या नावाने मुंबई इंडियन्सवर डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे. आठ भागाच्या या डॉक्युमेंटरीत मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील प्रवास दाखवण्यात येणार आहे. 1 मार्च 2019 ला या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग प्रसिद्ध होणार आहे.

नेटफ्लिक्सने मंगळवारी याबाबतची घोषणा केली. या आठ भागांमध्ये मुंबई इंडियन्सच्या ( 2013, 2015 व 2017) तीन जेतेपदांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. पण, मैदानावर घडलेल्या घटनांपलिकडे मैदानाबाहेरील प्रसंगांवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता ताणून धरणारी नक्की असेल.  कोणत्याही प्रतिस्पर्धींचा सामना करण्यापूर्वी खेळाडूंवर असलेले दडपण, चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी त्यांची असलेली धडपड, आदी सर्व गोष्टी या डॉक्युमेंटरीत असणार आहेत. ''दुनिया हिला देंगे हम'' हे ब्रिदवाक्य घेऊनच ही डॉक्युमेंटरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीगआयपीएल 2019रोहित शर्मानेटफ्लिक्स