Join us

IPLच्या 'त्या' नियमावर रोहित शर्मा रोखठोकच बोलला, म्हणाला- भारतीय खेळाडूंवर अन्याय सुरु आहे!

Rohit Sharma on IPL Rule, IPL 2024 Mumbai Indians vs Punjab Kings: यंदा रोहितला कर्णधारपदावरून हटवून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्याविषयावर बोलणे टाळण्यासाठी रोहित फारसा मुलाखत देताना दिसत नाही. पण आता त्याने एका नियमाबाबत स्पष्ट बोलणे पसंत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 14:10 IST

Open in App

Rohit Sharma on IPL Rule, IPL 2024 Mumbai Indians vs Punjab Kings: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानात आणि मैदानाबाहेर आपल्या शांत व संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्यावर होणाऱ्या टीकेला रोहित कायमच आपल्या बॅटने उत्तर देतो. सातत्याने टीका करणाऱ्या फॅन्सना रोहितने गेल्या सामन्यात CSKविरूद्ध शतक मारून गप्प केले. यंदा रोहितला कर्णधारपदावरून हटवून मुंबई इंडियन्सनेहार्दिक पांड्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्याविषयावर बोलणे टाळण्यासाठी रोहित फारसा मुलाखत देताना दिसत नाही. पण आता त्याने एका नियमाबाबत स्पष्ट बोलणे पसंत केले आहे.

"IPLमध्ये इम्पॅक्ट खेळाडू म्हणून बदली खेळाडू घेण्याचा एक नियम आहे. तो नियम मला फारसा आवडत नाही. या नियमामुळे ऑलराऊंडर खेळाडूंवर अन्याय होतो असं मला वाटतं. खरं पाहता संपूर्ण जगभरात क्रिकेट हा खेळ ११ खेळाडूंनी खेळण्याचा खेळ आहे. बारावा खेळाडू कोणत्याही क्रिकेटमध्ये आणला जात नाही. त्यामुळे हा नियम समाविष्ट करून केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते, पण त्यातून तुम्ही खेळातील बऱ्याच गोष्टींची मजा काढून घेता. जर तुम्ही क्रिकेटच्या दृष्टीने विचार केलात तर मला तर असं वाटतं की अनेक भारतीय खेळाडूंवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. शिवम दुबे असो किंवा वॉशिंग्टन सुद्धा असो हे खेळाडू या नियमामुळे गोलंदाजीच करू शकत नाहीयेत, जो माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो," असे अतिशय सडेतोड मत रोहित शर्माने मांडले.

"या नियमाबाबत काय करता येईल हे मला तरी सांगता येणार नाही. पण एक गोष्ट सांगू शकतो की बारावा खेळाडू हा तुम्ही केवळ मनोरंजनासाठी आणला आहात. खेळाची गरज आणि खेळपट्टीची परिस्थिती पाहून तुम्ही तो खेळाडू बदली म्हणून संघात घेता. जर तुम्ही चांगली फलंदाजी केलीत आणि जास्त गडी बाद होऊ दिले नाहीत, तर तुम्ही गोलंदाजाला संघात बदली खेळाडू म्हणून जागा देता. त्यामुळे तुम्हाला संघात सहा ते सात गोलंदाज खेळवण्याचा पर्याय उपलब्ध होतो. सध्या सर्व फलंदाज चांगली कामगिरी करत असल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त फलंदाजाची गरज भासत नाही आणि म्हणूनच सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी यायला लागत नसल्याचं बऱ्याच सामन्यांमध्ये दिसलंय," याकडेही रोहितने लक्ष वेधले.

टॅग्स :आयपीएल २०२४रोहित शर्मामुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या